🔹नागठाणा (बु.) ता. उमरी येथील मठाधिपतीच्या खुनाची शिवा संघटनेच्या वतीने सीबीआय चौकशीची मागणी...!



🚩मठावर जंगम बटुची उत्तराधीकारी म्हणुन नेमणुक करा,राज्या बाहेरील उत्तराधिकारी नेमण्यास शिवा संघटनेचा विरोध🚩

🔹हत्येचा सखोल तपास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने सिबीआय चौकशी नेमली नाही तर शिवा संघटना सिबीआय चौकशी साठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार🔹


नांदेड/जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील नागठाणा (बु.) या गावात वीरशैव-लिंगायत समाजाचा मठ अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. या मठाचे मठाधिपती म्हणून ष.ब्र.१०८ निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य महाराज मागील 12 वर्षांपासून कार्यरत होते. या मठाला हजारो शिष्य व भक्तांची मांदियाळी आहे. दि. 24 मे रविवारी पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान मठातच गुरुवर्यांचा निवार्णरुद्र पशुपती महाराजांचा व अन्य एका सेवेकर्‍याचा नागठाण बु. या गावातीलच आरोपी साईनाथ लिंगाडे या तरुणाकडुन गळा दाबून निघृण खूण करण्यात आला.
या संपूर्ण घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी शिवा संघटनेनी राज्याचे मुुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
 शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांना समजल्यानंतर त्यांनी त्वरित जिल्हा पोलीस अधिक्षक व जिल्हा पोलीस उपाधिक्षक यांना फोन करुन जो पर्यंत आरोपींना अटक करणार नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होवू देणार नाही संध्याकाळ ५ वाजेपर्यंत आरोपीला अटक न झाल्यास शिवा संघटना प्रसंगी लाॅकडाऊन तोंडुन तिव्र आंदोलन करणार असा पवित्रा घेतल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. तेव्हा भक्तांच्या व शिष्यांच्या उपस्थितीत विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. पण सदर प्रकरणाची चौकशी ही संशयास्पद वाटते.
        या प्रकरणातील डीवायएसपी सुनिल पाटील व पीएसआय अशोक अंत्रे यांनी तपासाची दिशा बदण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे व तपास योग्य रितीने होत नसल्यामुळे शिवा संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे एका निवेदनाद्वारे सीबीआय चौकशीची मागणी नुकतीच केली आहे .

 🚩महाराष्ट्रातील उत्तराधिकारी बसविण्यात यावा यासाठी शिवा संघटनेचा पुढाकार ....!

     त्याचबरोबर मठाच्या मालमत्तेवर डोळा ठेवून कर्नाटकी उत्तराधिकारी बसविण्यात यावा यासाठी काही जणांचे मनसुबे असून सदर मठावर उत्तराधिकारी म्हणून महाराष्ट्रातीलच गुरुवर्य बसविण्यात यावेत यासाठी शिवा संघटनेचा पुढाकार असणार आहे.असे प्रा.मनोहर धोंडे यांनी सांगितले .

       तसेच सदर प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत न केल्यास मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल असेही निवेदनात म्हटले आहे. सीबीआय चौकशीची मागणी शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, राज्य उपाध्यक्ष वैजनाथ तोनसुरे, राज्य सरचिटणीस विठ्ठल ताकबिडे, मराठवाडा अध्यक्ष संजय कोठाळे, जिल्हा संपर्क प्रमुख इंजि. अनिल माळगे, जिल्हाध्यक्ष (द.) संभाजी पा. बुड्डे, जिल्हाध्यक्ष (उ.) शंकर पत्रे, कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष (द.) दिगंबर मांजरमकर, जिल्हाध्यक्ष (उ.) विरभद्र बसापुरे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम घोडके, विद्यार्थी आघाडी शहर जिल्हाध्यक्ष राहुल शिवशेट्टे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष (द.) सौ. नंदा पाटील, आघाडी जिल्हाध्यक्ष (उ.) सौ. सत्यभामाताई येजगे, नांदेड शहर प्रमुख शिवराज उमाटे, विजय हिंगमिरे यांच्या सह आदींनी केली आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या