💥कोरोनाचे संकटात परळीकर सोसत आहेत तीव्र पाणीटंचाईच्या झळा....!


 💥परळीत तापमान 42 अशं.असतांनाही नागरिकांची पाण्यासाठी वणवण💥

महादेव गित्ते :
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- सध्या देशात कोरोनाचे संकट उभे असतांना नागरिकांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसासाव्या लागत आहे. पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. एकीकडे कोरोनाचे संकट आणि एकीकडे. पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरी व ग्रामीण भागात टँकर सुरू करण्याची दिवसेंदिवस प्रशासनाकडे मागणी वाढत आहेत.
        उन्हाळ्यांची चाहूल लागताच बहुतेक पाण्यांचे असलेले स्त्रोत्र जवळ जवळ तळ गाठण्यांच्या मार्गावर असताना.पाण्यांचे संकट अधिक गडद होत चालले असताना  पिण्यांच्या पाण्यांच्या प्रश्न गंभीर निर्माण होत असल्यांची चाहून नागरिकांना जाणवू लागली आहे. ग्रामीण भागात पाण्यासाठी विहीर, तलाव, कुपनलीका असते मात्र रणरणत्या उन्हामुळे या स्त्रोत्रांची पाण्यांची घट निर्माण झाली आहे.  मात्र अजुनही पाउस पडण्यांस दिड महीन्यांचा कालावधी असताना या पाण्यांच्या झळा सर्वांना सहन कराव्या लागत आहे. यामुळे महिला, पुरुष वयोवृद्ध नागरिक,  शाळेय विद्यार्थ्यांना  रणरणत्या उन्हामध्ये सुद्धा आपल्या पाणी कसे मिळेल हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवले जात आहे.पाणी टंचाईने उग्र रुप धारण केल्यामुळे टंचाईच्या झळा विद्यार्थी समवेत महिलावर्गांस सोसावी लागत आहे.
        कोरोना विषाणुंचा परळीत प्रादुर्भाव होवु नये म्हणुन प्रशासन रात्रंदिवस यात गर्क असतांना टाळेबंदीच्या काळात पाणीटंचाईच्या तीव्र झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहे. सध्या परळीतील तापमान 42 अंश आहे. अशा. कडकडीत उन्हाची पर्वा न करता पाण्याच्या शोधत नागरिक वणवण फिरत आहेत.  अत्यल्प पाऊस आणि त्यामुळे भूजल साठ्यात झालेली घसरण, यामुळे पाण्याची तीव्रता वाढते आहे. प्रशासकी अधिका-यांमध्ये बेबनाव असल्याने तालुक्यातील नागरिकांना वेठीस धरण्यात येत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सोडवणूक करावी. तीव्र पाणी टंचाईची दाहकता वाढत असतानाच प्रशासनाची उदासीनता त्यापेक्षा दुप्पटीने वाढत असल्याचे संतापजनक चित्र दिसून येत आहे. एकीकडे कोरोनाचे संकट आणि एकीकडे. पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरी व ग्रामीण भागात टँकर सुरू करण्याची दिवसेंदिवस प्रशासनाकडे मागणी वाढत आहेत.त्यामुळे प्रशासनाने तात्काळ टँकर मजुर करावे अशी मागणी नागरिक करत आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या