💥परभणी जिल्ह्यात कोरोना संशयीत रुग्णांसाठी स्वॅब टेस्ट लॅब सुरु...!



💥जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांच्या पुढाकारातुन व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागरगोजे टेस्ट लॅब सुरु💥

         परभणी,दि.24 :-  जिल्हा रुग्णालय येथे जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांच्या पुढाकारातुन व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिसोदीया पॅथोलॉजी लॅब यांच्या सहकार्याने रविवार दि. 24 मे 2020 रोजी कोरोना संशयीत रुग्णांसाठी स्वॅब टेस्ट लॅब सुरु करण्यात आली आहे.
          सद्यस्थितीत आजपर्यत जिल्हयामध्ये कोरोना पॉझिटिव्ह एकुण २२ रुग्णांपैकी २० रुग्ण वैद्यकिय निगराणीखाली असुन सदरील रुग्ण औषधोपचारास योग्य तो प्रतिसाद देत आहेत व त्यांची प्रकृती स्थिर आहे.  22 रुग्णापैकी एका कोरोना रुग्णाचा औषधोपचारादरम्यान मृत्यु झाला असुन एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे.
            रविवार दि. 24 मे 2020 रोजी कोरोना विषाणु संदर्भात सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयात पूर्वीचे १ हजार ८३६ व आज दाखल ५४ असे एकुण १ हजार ८९० संशयीत व्यक्तींची नोंद झालेली आहे. असे जिल्हा रुग्णालयाकडून कळविण्यात आले आहे.
                   -*-*-*-*-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या