💥परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील ती महिला कोरोना पॉझिटिव्ह...!


💥महिलेचा आज सोमवार दि.१८ रोजी सायं.६ वाजता प्राप्त झालेला स्वॅब अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला💥 

परभणी, दि.18 :-  सोनपेठ तालुक्यातील शेळगाव  येथील रहिवासी  दि. १५ मे २०२० रोजी मुंबईवरुन आलेली ४५ वर्षीय महिलेचा अहवाल सोमवार दि .१८ मे २०२० रोजी सांयकाळी ६  वाजता प्राप्त झालेल्या स्वॅब अहवालानुसार कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
         शेळगावची रहिवासी असलेल्या महिलेस ग्रामीण रुग्णालय सोनपेठ येथील कोरोना कक्षात वैद्यकिय निगराणीखाली ठेवण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत आजपर्यत जिल्हयामध्ये कोरोना पॉझिटिव्ह एकुण ६ रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालय परभणी येथे ४ रुग्ण व ग्रामीण रुग्णालय सोनपेठ येथील कोरोना कक्षात एक रुग्ण वैद्यकिय निगराणीखाली असुन सर्व रुग्ण औषधोपचारास योग्य तो प्रतिसाद देत आहेत व त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर एक रुग्ण यापुर्वीच कोरोनामुक्त झाला आहे.
          कोरोना विषाणु संदर्भात सोमवार दि. १८ मे २०२० रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयात पूर्वीचे १३६९ व आज दाखल ४० असे एकुण १४०९ संशयित व्यक्तींची नोंद झालेली आहे. आज रोजी एकुण ४३ स्वॅब स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
      जिल्ह्यात कोरोना विषयक सोशल मीडियावर अफवा पसरवत असल्याचे निदर्शनास आल्यास संबधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये कार्यवाही करण्यात येईल. तरी जिल्हावासियांनी अशा अफवांवर विश्वास ठेवु नये व न घाबरता कुठल्याही अफवांना बळी पडु नये. असे आवाहन  जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी केले आहे.
 -*-*-*-*-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या