☀️बिड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या निम्म्यावर....!


☀️जिल्ह्यात आज आणखी १४ रूग्ण कोरोनामुक्त☀️

बीड : अनेक दिवस तटबंदी अभेद्य राखलेल्या बीड जिल्ह्यात तिसऱ्या लाॅकडाऊन नंतर देण्यात आलेल्या सवलतींमुळे कोरोनाचा शिरकाव झाला. अल्प कालावधीतच कोरोनाबाधितांचा आकडा ६० च्या वर गेल्याने जिल्हावासियात भितीचे वातावरण आहे. मात्र जिल्हा आरोग्य प्रशासनाने घेतलेल्या परिश्रमांनतर जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या ५६ रूग्णांपैकी २९ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता फक्त २७ रूग्णांवर उपचार सुरू आहे. माजलगाव, केज, गेवराई हे तालुके कोरोनामुक्त झाले आहेत.

बीड जिल्ह्यात आतापर्यंत ६३ जणांची कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. यात एकाचा मृत्यू झाला होता तर आतापर्यंत १५ जण कोरोनामुक्त झाले होते. सहा रुग्णांना पुण्याला पाठविले होते. त्यामुळे जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत ४१ रुग्णांवर उपचार सुरू होते. यातील  माजलगाव तालुक्यातील १३ व बीड शहरातील एकाला प्रकृती ठणठणीत झाल्याने आज रविवारी घरी पाठविण्यात आले. त्यामुळे आता केवळ २७ रुग्णांवर उपचार सुरू राहणार आहेत. यापैकी तीन रूग्ण जोखमीचे आहेत.

सर्व कोरोनाबाधित हे मुंबईहून आलेले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार व त्यांच्या टिमने या सर्व रुग्णांवर योग्य उपचार करून त्यांना कोरोनामुक्त केले आहे. बीड जिल्ह्यासाठी ही सुखदवार्ता आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या