💥पुर्णा तालुक्यातील कंठेश्वर कोल्हापूरी बंधाऱ्यावर पोहण्यास गेलेल्या ३ तरूणांतील दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू...!💥गावकऱ्यांनी घटनेच्या १ तासात काढले पाण्यातून मृतदेह बाहेर💥

पुर्णा/तालुक्यातील निळा-महागाव शिववरील कंठेश्वर कोल्हापूरी बंधाऱ्या पोहण्यास गेलेल्या ३ तरुणातील २ तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज शनिवार दि.३०मे रोजी दुपारी १२-०० वाजेच्या सुमारास घडली या दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेले तरून कंठेश्वर येथून तिन किलोमीटर अंतरावर असलेल्या मौ.निळा या गावातील असून मृत युवकांची नावे ज्ञानेश्वर शिवाजी सुर्यवंशी वय वर्षे १८ व कल्यान उमाजी सुर्यवंशी वय वर्षे १५ अशी असून या घटनेतून सुदैवाने बचावलेल्या तरूणाचे नाव शंकर निवृत्ती सुर्यवंशी असे आहे.
सदरील घटनेती माहिती मिळताच निळा या गावातील गावकऱ्यांनी तात्काळ घटना स्थळाकडे धाव घेऊन १ तासाच्या अथक परिश्रमानंतर मयत दोन्ही तरूणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून दुपारी अंदाजे ०१-१५ ते ०१-३० वाजेच्या सुमारास शासकीय ग्रामीण रुग्णालय पुर्णा येथे शव विच्छेदना साठी आणल्याचे समजते घटनेची खबर मिळताच बिट जमादार सय्यद मोईन आपल्या पथकासह घटनास्थळी पोहचले.....

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या