💥पुर्णेत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी बाचाबाची दुचाकी स्वार वृध्द पित्यासह पुत्रावर गुन्हा दाखल..!


💥शहरातील छत्रपती संभाजी चौकात घडली घटना💥

पुर्णा/तालुक्यात लॉक-डाऊन संचारबंदी लागू झाल्यानंतर मागील २३ मार्च २०२० पासून लागू झाल्यानंतर पुर्णा पोलीस स्थानकाचे पो.नि.गोवर्धन भुमे यांनी तालुक्यातील वाढत्या चोऱ्या,अवैध रेती तस्करीसह वाढत्या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष करीत कुठलीही चौकशी नकरता सर्वसामान्य नागरिकांसह अत्यावश्यक सेवेची वाहन,शासकीय कर्मचारी आदींची वाहन विविध कारणांवरून पकडून मनमानी दंडात्मक कारवाई करण्याचा उपक्रम सातत्याने राबवीत असल्याने पोलीस प्रशासना विषयी नागरिकांतून नाराजीचा सुर उमटत असून अनेकांचे सातत्याने खटकेही उडतांना पाहावयास मिळत आहे.मागील ११ एप्रिल २०२० रोजी पुर्णा नगर परिषदेतील स्वच्छता विभागात कर्तव्यावर कार्यरत कर्मचाऱ्यांनाही पो.नि.भुमे यांच्या दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागल्याने नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन करीत उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डीले यांना निवेदन देऊन निषेध नोंदवल्याची घटना घडली होती.अश्याच प्रकारे अत्यावश्यक सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांना त्यांच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले होते.
पुर्णा शहरातील झिरोफाटा टी पॉईंट येथे चेकपोष्ट लावून वाहने अडवून कारवाई करणाऱ्या पोलीस प्रशासनाने आज गुरूवार दि.१४ मे रोजी ११-०० वाजेच्या सुमारास अचानक शहरातील आनंद नगर परिसरातील संभाजी चौकात शासकीय वाहन आडवी लावून वाहने अडवण्यास सुरूवात केली  यावेळी छत्रपती संभाजी चौक परिसरात दुचाकी पकडण्यावरुन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी दुचाकी स्वार वयोवृध्द पिता व त्याच्या पुत्राशी बाचाबाचीची घटना घडली या प्रकरणी पुर्णा पोलीस स्थानकात वृद्ध पित्यासह त्याच्या मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 संपूर्ण जिल्ह्यासह पुर्णा तालुक्यात कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता परभणीचे कर्तव्यदक्ष जिल्हाधीकारी दिपक मुगळीकर यांनी जिल्ह्यात संचारबंदी,जमावबंदी लागू केली असून यात नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी ०७-०० ते दुपारी ०२-०० वाजेपर्यंत सुट दिली आहे.
पुर्णा पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील धानोरा मोत्या येथील दोन लोक तोंडाला मास्क न लावता डबल सिट आपल्या विना नंबरच्या दुचाकीवरून शहरात बुलढाणा बँके समोर आले होते.यावेळी छत्रपती संभाजी चौक परिसरात असलेले पो.नि.गोवर्धन भुमे यांनी सदरील दुचाकी चालकास थांबवून विना नंबरची दुचाकी पोलीस स्थानकात घेऊन जाण्यासाठी सांगितले असता सदरील दुचाकी चालक तरुणाने ही दुचाकी जागेवरून न हलवता पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी  जोर जोराने ओरडत उपद्रव करीत व शेजारील रेड झोन जिल्ह्यात जिल्हाबंदी असतानाही कोरोनाची खबरदारी न बाळगता विनापरवानगी प्रवास करुन शहरात पोलीसांसमोर दुचाकी पोलीस स्थानकात नेण्यास अटकाव केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील दुचाकी चालक विठ्ठल भगवानराव मोहिते वय २३ वर्षे व वयोवृध्द भगवानराव मोहिते वय ६० वर्षे हे पिता-पुत्र धानोरा मोत्या येथील रहिवासी असून वृध्द भगवानराव मोहिते यांची पत्नी आजारी असल्याने व नांदेड येथील रुग्नालयात दाखल असल्याने आपला मुलगा विठ्ठल यास घेऊन विना नंबरच्या दुचाकीवरून पुर्णेत बुलढाणा बँके समोरील आपल्या नातेवाइकांकडे आले होते.दरम्यान या परिसरात उपस्थित असलेल्या पो.नि.भुमे व सहकारी कर्मचाऱ्यांनी विना नंबरची दुचाकी पोलीस स्थानकात घेऊन जाण्यासाठी सांगितले असता विठ्ठल मोहीते याने माझी आई नांदेड येथे रुग्णालयात उपचार घेत आहे मला तिकडे जावयाचे आहे तरी माझी गाडी घेऊन जाऊ नका म्हणुन विनंती केली व दाखवलेले कागदपत्रे न पहाता रस्त्यावर पोलीसांनी वयोवृद्ध वडीलांना व त्यास धक्काबुक्की केल्यानंतर संबंधित आरोपी व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांत बाचाबाची झाली असल्याचा आरोप भगवानराव मोहिते व त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.दरम्यान या घटने संदर्भात पो.कॉ.दिलीप राठौड यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पुर्णा पोलिस स्थानकात आरोपी भगवानराव हनुमंतराव मोहीते व विठ्ठल भगवान मोहीते यांचे विरोधात  कलम १८६,१८८,२६९,२७० आदींसह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या