💥पुर्णेत आज मध्यरात्री पासून दोन दिवस संचारबंदी...!


💥जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी जारी केले आदेश💥

परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी पूर्णा शहर आणि परिसरात आजपासून दोन दिवस संचारबंदी जाहीर केली आहे उपाय म्हणून त्यांनी तातडीने हे पाऊल उचलले आहे त्यामुळे अत्यावश्यक कामा खेरीज कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही.....

पूर्णा तालुक्यातील माटेगाव येथील एक रुग्ण आढळल्यामुळे तेथे खबरदारीच्या अनेक उपाय योजना कलेक्टर मुगळीकर यांनी घेतलेल्या आहेत..... बुधवारी मध्यरात्रीपासून ही संचारबंदी लागू राहणार आहे

सोनपेठ तालुक्यातील शेळगाव(महाविष्णु) येथील 6, गंगाखेड तालुक्यातील नागठाणा येथील 1, तसेच पूर्णेतील माटेगावातील 1 व परभणी तालुक्यातील पिंपळगाव ठोंबरे येथील 1 व्यक्ती असे एकूण 9 जणांचे स्वॅब बुधवार रोजी पॉझीटीव्ह आल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली.

 पूर्णा व परभणी तालुक्यातील प्रत्येकी एक पॉझीटीव्ह आढळलेय

बुधवारी सायंकाळी नांदेड येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या स्वॅबच्या अहवालानुसार जिल्ह्यात एकूण 9 जणांचे स्वॅब पॉझीटीव्ह आढळले आहेत. त्यात शेळगावात मुंबईहून परतलेल्या कोरोनाबाधित महिले व्यतिरिक्त अन्य 6 जणांचे स्वॅब पॉझीटीव्ह आढळले असून गंगाखेड तालुक्यातील नागठाणा येथील 1, परभणी तालुक्यातील पिंपळगाव ठोंबरे येथील 1 व पूर्णा तालुक्यातील माटेगाव येथील 1 रुग्णाचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 वर पोचली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या