💥नांदेड येथील लोहारगल्लीतील वृद्धाचा मृत्यू, पत्नीची मृत्यूशी झुंज....!💥दाम्पत्य कोरोनाबाधित कसे झाले,याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही💥

नांदेड: शहरातील लोहारगल्ली भागातील एक वृद्ध दाम्पत्य गेल्या अनेक कालावधीपासून आजारी होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता तसेच ताप व खोकलादेखील वाढत होता. उपचारासाठी  शहरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल  केले.
परंतु, बुधवारी सायंकाळी या दोघांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तातडीने हलविण्यात आले. लक्षणे असल्याने बुधवारी रात्री दोघांचाही स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आला. परंंतु, अहवाल येण्यापूर्वीच 74 वर्षीय वृद्ध पतीचे गुरुवारी सकाळी निधन झाले. त्याच्या पत्नीची प्रकृती गंभीर असून, ती रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. हे दाम्पत्य कोरोनाबाधित कसे झाले, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही....

💥लोहारगल्ली,चिरागगल्ली भाग सील💥

लोहारगल्ली,चिरागगल्ली भागात गुरुवारी एक  वृद्ध दांपत्य कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले असून त्यात पतीचा मृत्यू झाला आहे.यानंतर महापालिकेने या भागाला सील केले असून घरोघरी सर्वेक्षण सुरू केले आहे.या वृद्ध दांपत्यास कोरोनाची लागण कुठून झाली याचा शोध प्रशासन घेत असताना चिरागगल्ली भागात मात्र चिंतेचे वातावरण पसरले आहे....

💥नांदेड: आतापर्यंत ११६ पॉझिटिव्ह, ६७ जणांवर उपचार सुरू..!

- सहा जणांचा मृत्यू, दोघे फरार
- ४१ जणांना रुग्णालयातून सुटी
- लोहारगल्ली आठवा कँटेट मेंट झोन
- रेकॉर्डला चुकीचा पत्ता दिल्याने गाडीपुऱ्यातील लोक काळजीत
- नगिणाघाट परिसरातील आणखी एक मजूर बाधित

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या