💥परभणी जिल्ह्यात पुन्हा आढळले ४ कोरोना बाधीत रुग्न,जिल्हा प्रशासनात माजली खळबळ...!


💥जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २० जिल्ह्याची वाटचाल रेड झोनकडे💥 

परभणी प्रतिनिधी – जिल्ह्यात आज ४ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. हे रूग्ण ज्या परिसरात आढळून आले आहेत तिथे कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २० वर पोहोचली असून अॉरेंज झोनमधील जिल्ह्यातील वाटचाल रेडझोनकडे होत आहे.

गुरुवारी प्रशासनाला प्राप्त झालेल्या कोरोना अहवालामध्ये जिल्ह्यातील विविध भागातील ४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून यामुळे शहरवासियांची चिंता वाढली आहे. या अहवालामध्ये शेळगाव येथील १ व्यक्ती, परभणी शहरातील मिलिंद नगर, मातोश्री नगर येथील प्रत्येकी एक व परभणी तालुक्यातील असोला या गावातील  १ अशा एकूण ४ रुग्णांची भर पडली आहे.याअगोदर जिंतूर तालुक्यातील शेवडी येथे तीन, परभणी शहरातील मिलींद नगर भागात एक, साखला प्लॉट परिसरात एक आणि सोनपेठ तालुक्यात शेळगाव येथे एक असे रूग्ण आढळले होते. त्यानंतर सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील ६, पूर्णा तालुक्यातील माटेगाव येथील १ आणि गंगाखेड येथील १ व परभणी तालुक्यातील एका रूग्णाचा समावेश आहे.आजच्या अहवालाने मात्र जिल्हावासीयांची झोप उडाली असून सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या