💥परभणी जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी अर्ज सादर करावेत - जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर💥शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रासह सादर करावेत💥

         परभणी, दि.12 :- कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर कोरोना विषाणुचा प्रसार होऊ नये यासाठी होणाऱ्या गर्दीचे नियमन होण्यासाठी परभणी जिल्ह्यातील  शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी परभणी जिल्ह्याच्या parbhani.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध दिला आहे. तरी शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रासह सादर करावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दी.म. मुगळीकर यांनी केले आहे.
             शेतकऱ्यांनी डाऊनलोड केलेला अर्ज किंवा ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध असलेला पीक कर्जाचा अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सबंधित तलाठी यांच्याकडे सादर करावा. सबंधित तलाठी हे प्राप्त अर्ज गावनिहाय संकलित करुन ते अर्ज तहसील कार्यालयात जमा करणार आहेत. संबंधित बँकांनी जमा अर्ज तहसील कार्यालयाकडून प्राप्त करुन घ्यावेत व पुढील कार्यवाही करावी. शेतकऱ्यांनी अर्ज डाऊनलोड करावा किंवा अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात देखील उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित बँकांना देण्यात आलेल्या आहेत. असे जिल्हाधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.
           -*-*-*-*-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या