💥राज्याच्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना डावलून उपऱ्यांना उमेदवारी...!💥नेटकरी संतापले;गडकरी,फडणवीस,पाटलांवर टिका टिप्पणी;पंकजा मुंडे समर्थकांत संतापाची लाट💥

राज्याच्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता असताना त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर मुंडे समर्थकात संतापाची लाट उसळलेली आहे. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर थेट भाजपाचे जेष्ठ नेते नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. बीड जिल्ह्यात तशा प्रकारच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

शुक्रवारी भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी उमदेवारांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये परळी मतदार संघातून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना संधी देण्यात येणार असे बोलले जात होते मात्र तसे झाले नाही. पंकजा मुंडेच्या नावाचा विचार झाला नाही ही बातमी समजताच त्यांच्या समर्थकांनी आपला संताप सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करायला सुरुवात केली आहे. अनेक समर्थकांनी पक्षाच्या सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे सध्या बीड जिल्ह्यात समर्थकांचे राजीनामा सत्रही सुरू झाले आहे. केंद्राचे नाव पुढे करून राज्यातील जेष्ठ नेत्यांनीच हे तिकीट कापले असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या