💥पुर्णेत नाशिकहुन परतलेले दोन विद्यार्थी होम कोरोनटाईन..!



💥पोलीसांनी ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना १४ दिवसांसाठी केले होम कोरोनटाईन💥

पूर्णा/मार्च महिन्यात पुर्णेतुन नाशिकला प्रशिक्षणासाठी गेलेले दोन विद्यार्थी शुक्रवारी ८ रोजी दुपारी शहरात परतले.त्यांना पोलीसांनी ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना १४ दिवसांसाठी होम कोरोनटाईन केले आहे.
        कोरोना विषाणूचा पार्श्र्वभूमीवर राज्यात २३ मार्च पासून लाॅकडाऊन सुरू करण्यात आला आहे. दरम्यान पुर्णेतील डॉ. आंबेडकर नगर भागातील दोन विद्यार्थी  १५ मार्च रोजी प्रशिक्षणासाठी नाशिक येथे गेले होते.टाळेबंदी मुळे हे दोन्ही विद्यार्थी नाशिक शहरात अडकुन पडल्याने ते मागील काही दिवसांपासून आपल्या घरवापसीच्या प्रतिक्षेत होते.त्यांनी नाशिक प्रशासनाकडून वैद्यकीय तपासणी करून परभणी जिल्ह्यात येण्याचा परवाना घेत एका खासगी वाहनातून आज शुक्रवारी ८ रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास ते पुर्णा पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलीसांनी त्यांनी नाशिक येथून परतण्याचा परवाना वैद्यकीय तपासणी चे कागदपत्रे दाखवली.खबरदारी म्हणुन पुर्णा पोलिस ठाण्याचे गोपनीय शाखेचे गिरीश चन्नावार, मनोज नळगीरकर यांनी त्या दोघास ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेतली. रुग्णालय प्रशासनाने त्यांना १४ दिवसासाठी त्यांना घरातच राहण्याच्या सूचना देत होम कोरोनटाईन केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या