💥परभणी-हिंगोली जिल्ह्यातील सात आगारांतून उद्यापासून बसेस धावणार....!💥एस.टी.महामंडळाने चालविण्यात येणाऱ्या बसेसचा तात्पुरता आराखडा तयार केला आहे.💥 

परभणी,दि.21(प्रतिनिधी)-
परभणी व हिंगोली जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या सात आगारांतून शुक्रवार(दि.21) जिल्हातंर्गत बसेस धावणार आहेत. एस.टी.महामंडळाने चालविण्यात येणा-या या बसेसचा तात्पुरता आराखडा तयार केला आहे.
परभणी आगारातून परभणी ते सेलू या मार्गावर 16 फे-या होणार आहेत. परभणी ते पालम 18, परभणी ते लोहरा 12 फे-या व परभणी ते कुंभारी 12 अशा एकूण 70 फे-या होणार आहेत. एकूण 2 हजार 288 किमी एस.टी.धावणार आहे. जिंतूर आगारातून ही जिंतूर ते परभणीच्या ये-जा करणा-या 20 फे-या तर जिंतूर ते सेलू मार्गावर 16 अशा एकूण 36 फे-यांतून 1616 किमी बस धावेल. गंगाखेड आगारातून गंगाखेड ते परभणी 20, गंगाखेड ते सोनपेठ 16, गंगाखेड ते पालम 16 व गंगाखेड ते राणीसावरगाव 16 अशा एकूण 68 फे-या हातील. पाथरी आगारातून पाथरी ते परभणी 20, पाथरी ते सेलू 32, पाथरी ते सोनपेठ 10 अशा एकूण 62 फे-यांमध्ये बस धावणार आहे. 2028 किमीचे अंतर बस कापणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातही हिंगोली आगारातून हिंगोली ते औंढा, सेनगाव, वसमत अशा एकूण 54 फे-या, वसमत आगारातून वसमत ते औंढा, वसमत ते बाळापूर व वसमत ते वारंगा अशा 36 फे-या होतील. कळमनुरी आगारातून कळमनुरी ते बोल्डा, कळमनुरी ते हिंगोली व कळमनुरी ते वारंगा अशा 36 फे-या होणार आहेत. यासाठी नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी होणार असून एका आसनावर एकच प्रवासी यापध्दतीने बैठक व्यवस्था होणार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या