💥नांदेड येथील बंदाघाट परिसरात असंख्य अनोळखी लोकांची घुसखोरी...!💥कोरोना मुळे अगोदरच दहशतीत असलेल्या परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत,प्रशासनाचे दुर्लक्ष💥

नांदेड/संपूर्ण जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने अगोदरच आपला जिव मुठ्ठीत घेऊन वावरणाऱ्या नागरिकांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत असतांनाच कोरोन्टाईन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या शहरातील नगीना घाट बंदाघाट परिसराच्या आसपास अंदाजे तिनशें ते साडेतीनशें अनोळखी लोक आज मंगळवार दि.०५ में रोजी सकाळच्या सुमारास अचानक कुठून व कशासाठी आले याचा अंदाज कोणालाही लागला नाही त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले सदरील जमावातील लोक परिसरातच उघड्यावर शौचास बसत असल्याने व काही लोक बिडी गांजा आदीचे पित असल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.अगोदरच कोरोना व्हायरस या जागतिक महामारीने सर्वत्र उच्छाद मांडला असतांना अश्या पध्दतीने सोशल डिस्टन्सींगचा नियम न पाळता व संचारबंदी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करीत बंदाघाट परिसरात परिसरात वावरत असतांना प्रशासन याकडे दुर्लक्ष का करीत आहे असा प्रश्न उपस्थित होत असुन यातील अनेक लोक आजारी ही असल्याचे परिसरातील नागरिकांंचे म्हणने आहे.जिल्हा प्रशासनाने तात्काळ कठोर उपाययोजना करून या लोकांना परिसरातून इतरत्र हलवावे अशी मागणी होत आहे.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या