💥पुर्णेतील बहुजन क्रांती मोर्चा प्रणीत माणुसकीची साथ समूहा कडून लॉक-डाऊन काळात १९०० गोरगरीब कुटुंबांना मदत..!💥संघटनेच्या वतीने भिमा वावळे यांनी सहकारी दानशूर व कार्यकर्त्यांच्या प्रति केली कृतज्ञता व्यक्त💥 

पुर्णा (३१ मे) /कोरोना व्हायरस या जागतिक महामारीचा प्रादुर्भाव वाढू नयें याकरिता केंद्र सरकार व राज्य सरकारणे राज्यात २३ मार्च २०२० रोजी लॉक-डाऊन व संचारबंदीची घोषणा केली.सदरील घोषणेच्या दोन महिण्याच्या कालावधीत शहरातील हातावर पोट असणाऱ्या शेतमजूर-बांधकाम मजूर-रोजमजूर-घरकाम मजूर आदींच्या रोजगारावर गधा आल्याने त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आल्याचे निदर्शनास आल्याने मानुसकीच्या भावनेतून त्यांच्या मदतीसाठी शहरातील बहुजन क्रांती मोर्चा या संघनेने पुढाकार घेतला.


 शहरातील गरीब गरजू लोकांना उत्पन्नाची साधन मर्यादित असल्यामूळे त्यांचे हाल होणार असे निदर्शनास आल्याने अश्या परिस्थितीमध्ये आपन एकटे काही करू शकणार नाहीत असा निराशावाद यत्किंचितही मनात न आणता हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब रोजमजूर शेतमजूरांना मानुसकीच्या निर्मळ भावनेने  मदत कार्य करण्याचा प्रस्ताव बहुजन क्रांति मोर्चा संघटनेच्या कार्यकर्त्यां समोर संघटनेचे स्थानिक नेते भीमा वावळे यांनी ठेवला त्यांच्या या प्रस्थावावर संघटनेच्या अन्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तात्काळ पावले उचलायला सुरवात केली. या विषयावर कॉम्रेड शेख नसिर ह्यांच्याशी चर्चा झाली तेव्हा असे ठरले की या कार्याची सुरूवात एकट्याने करण्या पेक्षा मिळून केले तर आपल्याला जास्त लोकांना मदत करता येईल या विचाराने वैचारिक मतभेद बाजूला ठेवून माणुसकीची साथ या समूहाने प्रत्यक्ष कार्याला सुरवात केली आणि पाहता पाहता आज चार लॉक डाऊन चा कालावधी पूर्ण करत समुहाने १९०० पेक्षा  कुटुंबांना मदत केली.
शहरातील बहुजन क्रांति मोर्चा संघटनेचे स्थानिक नेते तथा या उपक्रमाचे संयोजक भिमा वावळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना असे नमुद केले की मदत कार्याचे श्रेय आम्हाला मदत पुरविणार्‍या सर्व वरिष्ट आणि तरुण मंडळीचे आहे ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेऊन आम्हाला जवळ जवळ दीड लाखांची मदत केली. युद्धात एखादा वैमानिक आपले प्राण पणाला लाऊन लढतो पण त्याच्या मागे असलेल्या सर्व यंत्रने शिवाय तो लढू शकत् नाही. त्याच प्रमाणे आम्ही सुद्धा दान करणार्‍या शिवाय हे मदत कार्य करू शकलो नसतो. म्हणुन सर्वच डोनर चे मी माझ्या संघटनेच्या वतीने धन्यवाद व आपल्या सहकारी कार्यकर्त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या