💥कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परभणीतील दोन मंगल कार्यालये अधिग्रहित...!



💥जिल्हादंडाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी आदेशान्वये अधिग्रहित केले आहेत💥

परभणी :- जिल्ह्यात परराज्यातुन आणि परजिल्ह्यातुन आलेल्या स्थलांतरित नागरिक व कामगारांसाठी अन्न , निवारा व वैद्यकीय सुविधा पुरविणे आवश्यक असून या पार्श्वभूमीवर परभणी शहरातील दोन मंगल कार्यालये जिल्हादंडाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी आदेशान्वये अधिग्रहित केले आहेत.

                 जिल्हयात कोरोना विषाणू ( COVID - 19 ) या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव होवू नये यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील प्रचलित नियमानुसार परभणी शहरातील  वसमत रोड वरील अक्षदा मंगल कार्यालय व पाथरी रोडवरील रेणुका मंगल कार्यालय या दोन इमारती तात्पुरत्या स्वरुपात पुढील आदेशापर्यंत अधिगृहीत केल्या आहेत.

            जिल्हा शल्यचिकीत्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी  यांच्या समन्वयाने या इमारतीमध्ये निवास व्यवस्था केलेल्या नागरिक व कामगारांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. असे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , परभणी यांनी निर्गमित केले आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या