💥नांदेड मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्नांच्या संख्येत वाढ आज पुन्हा ११ रुग्न आढळले...!💥कोरोना बाधीत रुग्नांची संख्या मागील ५२ व आजचे ११ असे एकून ६३ झाली आहे💥

नांदेड - कोरोना पॉझिटिव्हची संख्या नांदेडमध्ये वाढत चालली असून आज मंगळवार दि.१२ मे रोजी दिवसभरात अकरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी दुपारी बारड (ता. मुदखेड) येथील मुंबईहून आलेला तरुण पॉझिटिव्ह आढळून आला होता. आता रात्री नऊ वाजता आणखी दहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पूर्वीचे ५२ आणि आजचे ११ असे एकूण ६३ रुग्ण पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सिक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी ही माहिती दिली. मुंबईतून चालत बारड (ता. मुदखेड) येथे आलेल्या बावीसवर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.बाधित तरुण कुटुंबीयांसह बारडकडे येण्यासाठी मुंबईहून पायी निघाला होता. त्यामध्ये महिला व लहान मुलांचा समावेश आहे. मंठा येथून एक वाहन मिळाल्यानंतर हे सर्वजण रविवारी (ता. दहा) बारडला पोचले. यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालय, धर्मशाळा येथील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाइन करून त्यांचे स्वॅब घेण्यात आले. यात तो तरुण कोरोनाबाधित असल्याचे मंगळवारी आढळून आले. यामुळे माहूरनंतर आता बारडमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सदर तरुणाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. भोसीकर यांनी दिली.मुंबई येथून निघताना त्यांची कुठेही तपासणी झाली नाही. हे कुटुंब मुंबईत कामासाठी गेले होते. एकूण २२ जण मुंबई येथून पायी आले होते. त्यापैकी चारजणांना आजाराची लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर तिघांचा अहवाल येणे बाकी आहेत. हे प्रवासी नागरिक बारडमध्ये प्रवेश केल्याबरोबर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले होते. यामुळे ते बारड येथे कोणाच्याही संपर्कात आले नाहीत. दरम्यान, मंगळवारी रात्री नऊ वाजता आणखी दहा पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे उपजिल्हाधिकारी श्री. शेळके यांनी दिली. त्याचबरोबर सदरील दहाही रुग्ण हे लंगरसाहिब येथील असल्याचे सांगितले. त्यामुळे आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६३ झाली आहे. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, यापूर्वी पॉझिटिव्ह आढळलेले दोन रुग्ण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरूच आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या