💥पुर्णा तालुक्यातील ग्रामीण भागात शेकडो ब्रास रेती साठे,मोठ्या प्रमाणात उत्खनन...!💥महसुल प्रशासना कडून कंठेश्वर येथे एक ट्रॅक्टरसह २० ब्रास रेतीसाठा जप्त💥 

पुर्णा/तालुक्यातील गोदावरी-पुर्णा नदीपात्रात लोखंडी टोकरे व तराफ्यांच्या साह्याने मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन होत असल्याचे दिसत असून या अवैध रेती उत्खनन व चोरट्या रेतीच्या तस्करीतून प्रतिमहिना लाखो रुपयांची उलाढाल होत असून याकडे महसूल व पोलीस प्रशासनाचा जाणीवपूर्वक कानाडोळा होत असल्याने तालुक्यात रेती माफियांनी अक्षरशः नग्न तांडव घातल्याचे पाहावयास मिळत आहे.परंतु महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून महिण्या पंधरा दिवसाला एखाद दुसरी किरकोळ स्वरुपाची कारवाई नाट्य रंगवून वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे.
तालुक्यातील कात्नेश्वर शिवारात महसूल प्रशासनाने तहसिलदार वंदना मस्के यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवार दि.१२ मे २०२० रोजी रात्री ०८-०० वाजेच्या सुमारास अश्याच प्रकारे कारवाई करीत अवैधरित्या वाळू उपसा करुन साठवुन ठेवण्यात आलेल्या २० ब्रास वाळू साठ्यासह एक ट्रॅक्टर ज्याचा क्र.एम.एच.२२-ए.डी. १२८९ जप्त करुन संबंधित ट्रॅक्टर मालकास १ लाख ४० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची कारवाई केली आहे.
पूर्णा तालुक्यात अद्याप पर्यंत एकाही रेती स्थळाचा महसूल प्रशासनाने अधिकृतपणे लिलाव केलेला नसतांनाही रेती तस्करांनी तालुक्यातील पुर्णा-कानखेड-कान्हेगाव-माटेगाव-सुकी-पिंपळगाव बाळापूर-धनगर टाकळी-कंठेश्वर परिसरात बेकायदेशीर रित्या वारेती धक्के तयार करीत शेकडो ब्रास रेतीचे उत्खनन केल्याचे निदर्शनास येत असून या मोठ्या प्रमाणात उत्खनन केलेल्या अवैध रेतीचे साठे या परिसरात अद्यापही दिसत असून महसूल प्रशासनाकडून मात्र किरकोळ रेती साठे जप्तीचे नाट्य रंगवून उर्वरीत रेती साठ्याची विल्हेवाट लावल्या जात असल्याचे परिसरातील नागरिकांतून बोलल्या जात आहे.दरम्यान कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून लॉक-डाऊन संचारबंदीसह जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असतांनाही रेती तस्करांकडून पुर्णा-गोदावरी नदीपात्रातून असंख्य कामगारांच्या साहाय्याने अवैध रेती उत्खनन करण्यात येत असून आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम १८९७ कायद्याची पायमल्ली करीत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी दिपक मुगळीकर यांच्या आदेशाची अवज्ञा केली जात आहे... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या