💥परभणी जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी आरोग्य तपासणी बंधनकारक - जिल्हाधिकारी💥असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मुगळीकर यांनी केले💥 

                 परभणी, दि. 5 :- शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे विविध जिल्ह्यातील कामगार, पर्यटक,भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्ती परभणी जिल्ह्यात अडकले आहेत.   त्यांना परभणी जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी  आरोग्य तपासणी करणे बंधनकारक आहे. तरी ही आरोग्य तपासणी जिल्ह्यातील निश्चित केलेल्या ठिकाणी जावून करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दी.म. मुगळीकर यांनी केले आहे.
           आरोग्य तपासणीची सुविधा परभणी शहर महानगरपालिका क्षेत्रातील  साकला प्लॉट, इनायत नगर , खंडोबा बाजार , सय्यद तुराबुल हक़ दरगाह येथील नागरी प्राथमिक आरोग्य तपासणी केंद्रात व  परभणी शहर महानगरपालिका रुग्णालयात तसेच तालुकास्तरावर, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील
संबंधित उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात तर ग्रामस्तरावरील प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी  उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व खाजगी नोंदणीकृत डॉक्टर्स, दवाखाने यांचे प्रमाणपत्र ई- पास प्रक्रियेसाठी वैध असेल. असेही कळविण्यात आले आहे.
             -*-*-*-*-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या