💥परभणी जिल्ह्यातील कोरोना संशयितांच्या अहवालाची अद्यापही प्रतिक्षाच...!💥आज मंगळवार दि.२६ मे रोजी पुन्हा २१ जण दाखलः संशयित रुग्नांची संख्या १९७१💥

परभणी / येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर आज मंगळवार दि.२६ मे रोजी सायं.०५-०० वाजेपर्यंत एकूण २१ संशयीत पुन्हा दाखल झाले असून आता संशयितांची एकून संख्या १९७१ पर्यंत पोचली असून २६५ संशयितांच्या स्वॅबचे अहवाल प्रलंबीत आहेत.

एकूण २००४ पैकी १६४७ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण ३६ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर ३४ संशयितांचे अहवाल अनिर्णायक आहेत. २२ जणांचे स्वॅब तपासणीसाठी आवश्यक नसल्याचाही अहवाल मिळाला आहे. एकूण २६५ स्वॅबचे अहवाल अद्यापही प्रलंबीत आले आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालयातून आज मंगळवारी एकूण ६० जणांचे स्वॅब नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असल्याचे समजते.रविवारी रात्री एकूण ३० जणांचे स्वॅबचे अहवाल निगेटीव्ह आले. तर १४ जणांचे पॉझीटीव्ह आले. सोमवारी सायंकाळपर्यंत एकाही स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला नाही.
 जिल्हा शासकीय रूग्णालयात मंगळवारीपर्यंत विलगिकरण कक्षात ४४,रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात ३१७ जण आहेत. विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झालेले १२१३ आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या