💥पुर्णेत पोलीसांशी हुज्जत घालणे तिन तिरकुटांना पडले महागात...!



💥पोलीस स्थानकात तिघा आरोपीं विरोधात गुन्हा दाखल💥

पूर्णा/कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता प्रशासनाने लॉक-डाऊन व संचारबंदीसह कलम १४४ अंतर्गत जमावबंदी आदेश लागू केलेला असतांना तसेच राज्यात आपत्ती व्यवस्थापण कायदा - २००५ व साथीचे रोग अधिनियम - १८९७ कायदा लागु असतांनाही जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी दिपक मुगळीकर यांच्या आदेशाची अवज्ञा करीत कर्तव्यावर असलेल्या पोलीस पथकाशी 'चोर तर चोर वरून शिरजोर' या उक्तीचा प्रत्यय देत कोरोना विषाणूं पासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी स्वतःचा जिव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांशी अरेरावी करणारे तिन तिरकूटांना आज मंगळवार दि.०५ में रोजी पुर्णा पोलीसांनी कायद्याचा चांगलाच बडगा दाखवल्याची घटना घडली.
       सविस्तर वृत्त असे की आज सकाळच्या सुमारास वाहन तपासणीसाठी पोलीस स्थानकात घेऊन जाण्यास तयार न होता उलट पोलीस कर्मचऱ्याशीच हुज्जत घालणाऱ्या तिघांच्या विरोधात पूर्णा पोलीस स्थानकात रितसर गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
      पूर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस कर्मचारी हे गस्त घालीत असताना सकाळी०८-३० वाजेच्या सुमारास पशु वैदकीय दवाखाना समोरील रस्त्यावरून जाणाऱ्या एका ऑटो रिक्षाची तपासणी केल्यानंतर पोलीस पथकाला शंका आल्याने सदरील ॲटो पोलीस स्थानकात घेऊन येण्यास पोलिस कर्मचाऱ्यांनी सांगितले असता तसे न करता उलट विरोध करीत जोरजोराने ओरडून ॲटोतील तिघा तिरकूटांनी पोलिसांशी हुज्जत घातली. यावेळी तिघांनीही तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी दिपक मुगळीकर यांच्या निर्देशाची अवज्ञा करीत तोंडाला मास्क न लावून विषाणू संसर्ग अनुषंगाने असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उलघन केले म्हणून जमादार बि.एस.धबडे यांच्या तक्रारी वरून सय्यद रौफ सय्यद गफार,सय्यद युसूफ सय्यद गफार,शेख दादामिया शेख हुसेन या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे जमादार नितीन वडेकर हे पुढील तपास करीत आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या