💥परभणी जिल्ह्यात तहसील देणार बँकांना फेरफारच्या नकला जिल्हा प्रशासनाचा आदेश...!


💥असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी बजावले आहेत.💥

परभणी/ खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर शेतक-यांनी मागणी केलेल्या पीक कर्जाच्या अनुषंगाने संबंधीत बँकेने फेरफार नकलीची मागणी केल्यास संबंधीत तहसील कार्यालयाने अभिलेख कक्षातून फेरफारच्या नकला संबंधीत बँकांना परस्पर पुरवाव्यात असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी बजावले आहेत.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा उपनिबंधक, जिल्हा अग्रणी बँक, सर्व बँकर्स यांची खरीपाच्या पार्श्‍वभूमीवर पीककर्जाच्या आढावा संदर्भात व्यापक बैठक शुक्रवारी(दि.22) आयोजित करण्यात आली. त्यातून पीककर्जाबाबत गांभिर्याने विचारविनियम करण्यात आला. विशेषतः जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी शेतक-यांना अगदी वेळेवर, जलदगतीनेे कर्ज उपलब्ध करा, अशा सूचना दिल्या. विशेषतः पीककर्जाच्या अनुषंगाने फेरफार नकलाबाबत मोठ्या प्रमाणावर अडचणी उद्भवत असल्याची माहिती समोर आल्या बरोबर जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी पीककर्जाबाबत संबंधीत शेतक-यांनी मागणी केलेल्या कर्जाच्या अनुषंगाने संबंधीत बँकेने फेरफार नकलीची मागणी केल्यास तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षातून फेरफाराच्या नकला संबंधीत बँकांना परस्पर पुुरवाव्यात असे आदेश दिले आहेत.

सरपंचांना सहकार्य करण्याचे आदेश
पीककर्जा बाबत प्राप्त अर्ज जमा करण्याबाबत सरपंचांनी त्या-त्या ठिकाणी गावनिहाय नियुक्त केलेल्या नोडल अधिका-यांना सर्वेत्तपरी सहकार्य करावे, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी दिले आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या