💥महिला व बालकांच्या संरक्षणासाठी; जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून “वन स्टॉप सेंटर” ची स्थापना...!💥अशी माहिती नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे  सचिव राजेंद्र रोटे यांनी दिली आहे💥

नांदेड, (जिमाका) दि. 4 :- लॉकडाऊनच्या काळात कुठल्याही महिला अथवा बालकावर कौटुंबिक हिंसाचार होत असल्यास त्यांना त्यापासून संरक्षण व मदत मिळावी या हेतूने नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून “वन स्टॉप सेंटर” ची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे  सचिव राजेंद्र रोटे यांनी दिली आहे. 
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या मार्गदर्शनानुसार नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया यांच्या मार्गदर्शनाखाली “वन स्टॉप” सेंटरची स्थापना करण्यात आली आहे.  या सेंटरचे काम 24 तास चालू राहील यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून अॅड. सौ. पी. एच. रतन व अॅड. कुमूताई वाघमारे यांची नेमणूक करण्यात आली आहे. कौटुंबिक हिंसाचार होत असल्यास आपण अॅड. सौ. पी. एच. रतन यांना 9923040996 व अॅड कुमूताई वाघमारे यांना 9689881195 या मोबाईल नंबर संबंधितांनी संपर्क करावा अथवा legalaidnanded@gmail.com या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या ई-मेल आयडीवर सुद्धा आपण आपली तक्रार नोंदवू शकता, असे आवाहन नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव राजेंद्र रोटे  यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या