💥पुर्णेत जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्या आदेशाची सातत्याने होत आहे अवज्ञा...!💥सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची पायमल्ली,अतिरिक्त दराने वस्तुंची विक्री भावभलक लावण्यास टाळाटाळ💥

पुर्णा/शहरासह संपूर्ण तालुक्यात लॉक-डाऊन संचारबंदी काळात मागील २ महिण्यांपासून अत्यावश्यक वस्तुंची व खाद्य सामग्रीची खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांची सातत्याने आर्थिक पिळवणूक केली जात असून जिल्हा प्रशासनाने लॉक-डाऊन काळात सर्वसामान्य जनतेला अत्यावश्यक वस्तुंची खरेदी करता यावी याकरिता काही नियत व अटींवर किराणा दुकानदार,फळ-भाज्या विक्रेते,दुध डेअरी मालक आदींना आपली प्रतिष्ठान उघडण्याची परवानगी दिली असून सोशल डिस्टन्सिंग सामाजिक अंतर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत तसेच प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेतच व्यापाऱ्यांनी आपली दुकान उघडावी व आपआपल्या दुकानांसमोर वस्तूंचे भावफलक लावणे बंंधनकारक केले आहे.
कोरोना व्हायारस जागतिक महामारी ठरत असलेल्याने जिल्ह्यातील जनतेला कोरोना व्हायरस कोविड-१९ विषाणू संसर्गापासून बचाव व्हावा याकरिता राज्यासह संपूर्ण जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ व साथीचे रोग प्रतिबंधक कायदा लागू केला असतांना शहरातील किराणा व्यापारी सामाजिक अंतराच्या नियमांचे उल्लंघन करीत प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळे नंतरही आपली प्रतिष्ठान उघडी ठेवून परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेऊन मनमानी दराने अत्यावश्यक खाद्य सामग्रीची विक्री करीत असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्या आदेशाची अवज्ञा करणाऱ्या शहरातील डॉ.आंबेडकर चौक परिसरातील सदभावना प्रोव्हिज सुपर शॉपी या किराना दुकानदाराने शनिवार दि.२३ मे २०२० रोजी आपत्ती व्यवस्थापन कायद्याची व साथीचे रोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करत आपल्या दुकानावर तोंडास मास्क न लावता ठराविक वेळे नंतरही अर्धवट दुकान उघडे ठेवून ग्राहक करीत असल्याने व कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होईल असे हायगायीचे कृत्य केले असल्याने संबंधित दुकान मालका विरोधात पुर्णा पोलीस स्थानकात पो.ना.नागनाथ भागवतराव पोते यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुरनं.१७३/२०२० कलम १८८,२६९,२७० भादवीसह साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम २,३,४,व सह कलम ५१(ब) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापण कायदा-२००५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान २४ मार्च २०२० पासून लॉक-डाऊन व संचारबंदी लागल्याच्या २ महिण्याच्या कालावधीत अत्यावश्यक खाद्य सामग्रीची खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य जनतेची किराणा व्यापाऱ्यांकडून सातत्याने आर्थिक पिळवणूक होत असतांना निद्रीस्त अवस्थेत असलेल्या स्थानिक प्रशासनाला अचानक जाग आल्याने पुर्णा नगर परिषद प्रशासनाने काल २३ मार्च २०२० रोजी शहरातील नफेखोर व्यापाऱ्यांना आपआपल्या दुकानांपुढे अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतीचे 'भावफलक' लावण्याचे आदेश देऊन आदेशाचे पालन न केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला असला तरीही आज रविवार दि.२४ मे २०२० रोजी शहरातील एकाही किराणा दुकानदाराने आपल्या दुकाना समोर 'भावफलक' लावल्याचे निदर्शनास आले नसल्यामुळे स्थानिक प्रशासन संबंधित दुकानदारांवर प्रशासनाच्या आदेशाची अवज्ञा केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करणार काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून प्रत्येक दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत असल्याने सामाजिक अंतराच्या नियमांचे सर्रास सर्वत्र उल्लंघन होतांना दिसत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या