💥जिल्हा सामान्य रुग्णालय व कोविड हॉस्पीटलचं यशोचित व्यवस्थापन आवश्यक....!



💥जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी व्यक्त केले परखड मत,सहा सदस्यीय समिती स्थापन💥

परभणी/जिल्ह्यातील आपत्तकालीन परिस्थितीचे गांभीर्य  ओळखून जिल्हा सामान्य रुग्णालय व कोविड हॉस्पीटल याचे यथोचित व्यवस्थापन करणे नितांत गरजेचे असून जेणे करून अत्यावश्यक सेवेच्या कामाचे व्यवस्थापन कोलमडणार नाही, असे परखड मत जिल्ह्याचे कर्तव्यकठोर जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी व्यक्त केले.

कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव व जिल्हा शासकीय रुग्णालय व कोविड हॉस्पीटलमधील एकंदरीत गलथान कारभारा बद्दल तिव्र असंतोष पसरला असतांना जिल्हा सामान्य रुग्नालयाचा कारभार सुधारावा याकरिता जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली.
जिल्हा प्रशासनाने स्थापण केलेल्या या समितीद्वारे कोरोनाबाबत सर्वोत्तपरी उपाययोजनां कराव्यात व त्याची तात्काळ प्रभावी अंमलबजावणी करावी,असे आदेश जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिले. आपत्तकालीन स्थितीत शासकीय रुग्णालय व कोविड हॉस्पीटल याचे यशोचित्त व्यवस्थापन नितांत गरजेचे आहे. अत्यावश्यक सेवेच्या कामाचे व्यवस्थापन कोलमडणार नाही, हे पहावेच लागेल असे स्पष्ट करीत जिल्हाधिकारी श्री मुगळीकर यांनी सहा सदस्यीय समिती स्थापन केली असून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रकाश डाके, पोलिस निरीक्षक गजानन सैंदाने,जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक नोडल अधिकारी प्रवीण खर्डेकर, तेथीलच लिपीक तथा सहाय्यक नोडल अधिकारी अभिजीत तळेगावे तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ लिपीक तथा नोडल अधिकारी जावेद खान यांची या समितीत नियुक्ती केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या