💥नांदेड विभागातील सहा रेल्वे स्थानकावर आज २२ मे पासून आरक्षण केंद्र पुन्हा सुरु...!


 💥हुजूर साहीब नांदेड-अमृतसर सचखंड विशेष एक्स्प्रेस ०१ जून पासून धावणार💥

1)      रेल्वे बोर्डाने कळविल्या नुसार  आज दिनांक २२ मे  २०२०  पासून नांदेड  विभागातील  सहा रेल्वे स्थानकावर रेल्वे आरक्षण केंद्र पुन्हा प्रवाशांकरिता सुरु करण्यात आले आहे.  यात नांदेड, पूर्णा, परभणी, सेलू, जालना आणि औरंगाबाद रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
       लॉक डाऊन आणि कोरोना मुळे उद्भवलेल्या परिस्थिती मुळे आरक्षण कार्यालयाच्या वेळा पुढील प्रमाणे असतील
सकाळी - ०८.००  ते १२.००  वाजे पर्यंत
दुपारी - १४.००  ते १७.००  वाजे पर्यंत

2)      तसेच रेल्वे बोर्डाने दिनांक ०१ जून २०२० पासून देशभर २०० विशेष गाड्या चालविण्याचे ठरविले आहे. यात नांदेड विभागातून नांदेड-अमृतसर-नांदेड दरम्यान सचखंड विशेष एक्स्प्रेस धावणार आहे.

हि गाडी दिनांक 1 जून रोजी नांदेड येथून गाडी संख्या ०२७१५ नांदेड- अमृतसर विशेष एक्स्प्रेस बनून धावेल. तसेच दिनांक ०३ जून पासून अमृतसर येथून हि गाडी संख्या ०२७१६ अमृतसर-नांदेड सचखंड विशेष एक्स्प्रेस बनून धावेल.  या गाडीस २२ डब्बे असतील, यात वातानुकुलीत तसेच बगैर वातानुकुलीत डब्बे असतील. सामान्य म्हणजेच जनरल चे डब्बे नसतील.
या विशेष गाडीच्या वेळा नियमित नांदेड-अमृतसर-नांदेड सचखंड एस्क्प्रेस सारख्याच असतील.

3)      महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या कोविड-१९ चे दिशा निर्देशां नुसार महाराष्ट्रातील दोन जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या रेल्वे स्थानका दरम्यान  प्रवाशांना या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करता येणार नाही.

4)      या पूर्वीच ठरविल्या नुसार श्रमिक विशेष गाड्यांचे नियोजन संबंधित राज्य सरकार करेल.

प्रवाशांना विनंती आहे कि त्यांनी रेल्वे आरक्षण केंद्रावर / रेल्वे स्थानकावर येतांना तसेच रेल्वे गाडीत प्रवास करतांना भारत सरकारने तसेच संबंधित राज्य सरकारने  कोरोना (कोविड-१९) चा प्रसार रोखण्या  करिता दिलेल्या  दिशा निर्देशांचे पूर्ण पालन करावे. तसेच ते ज्या राज्यात प्रवासाने पोहोचतील त्या सम्बन्धित राज्याच्या कोरोना (कोविड-१९) चा प्रसार रोखण्या  करिता दिलेल्या  दिशा निर्देशांचे पूर्ण पालन करावे.

विशेष गाड्यांमध्ये प्रवेश करण्या पूर्वी प्रवाशांची शारीरिक तपासणी करण्यात येणार नाही. ज्या प्रवाशांना कोरोना ( कोविड-19) चे कोणतेही लक्षण नसेल त्यांनाच या रेल्वे गाड्यांत प्रवेश दिला जाणार आहे याची प्रवाशांनी कृपया नोंद घ्यावी. रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे.असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वे विभागाने केले आहे...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या