💥पुर्णेत बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोनाचा पार्दुभाव होण्याची शक्यता...!💥जमावबंदी सर्रास आदेशाचे उल्लंघन,रेड झोन जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली ये-जा वाढली💥
               
पूर्णा/परभणी जिल्ह्याचे कर्तव्यकठोर जिल्हाधिकारी  पोलीस अधिक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक हे आपल्या कर्तव्यात कुठलीच कसर न ठेवता स्वतःचा जिव धोक्यात घालून प्रामाणिकपणे प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.सबंध जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदी जमावबंदी लागू करण्यात आली असूनही, पुर्णा शहरातील बेजबाबदार नागरिकांकडून अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली  जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आत्यामुळे शहरासह तालुक्यात कोरोनाचा पार्दुभाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
      राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाने लॉकडाऊन, संचारबंदीसह कलम १४४ अंतर्गत जमावबंदी आदेश लागू केला असून शासनाने आपत्ती व्यवस्थापण कायदा २००५ व साथरोग प्रतिबंधक कायदा लागु करण्यात आला आहे. असे असतानाही नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करता यावी याकरिता सकाळी ०७ ते ११ वाजेपर्यंत खरेदी करता यावी यासाठी मुभा देण्यात आली
.परंतू शहरातील भाजीपाला फळ विक्रेते,काही किराणा दुकानदार, तसेच बाजार समीती यार्डातील दुकानावर, बँके समोर मात्र निर्धारीत वेळेत सोशल डिस्टंशिंगचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत.तर काही जणं कर्तव्य बजावणा-या कर्मचा-यांशी वाद घालताना दिसत आहेत.शेजारचे नांदेड, हिंगोली जिल्हे कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे धगधगत आहेत.असे असतानाही त्या जिल्ह्यांत अत्यावश्यक सुविधेचे किराणा साहित्य,फळं भाजीपाला खरेदी विक्री वाहने जात असल्याचे पहावयास मिळत आहेत.सकाळी शहरात तर अक्षरशः जत्राच भरली की काय असा प्रश्न अनेकांना पडतो आहे.स्थानिक प्रशासनाकडून कडून जिल्हा प्रशासनाच्या निर्देशाची काटेकोरपणे अंमलबजावणी केला जात आहे परंतु शहरातील काहीं बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या