💥शारीरिक अंतर राखले नाही,तर दुकान बंद व पाच हजार दंड💥
* दुकानांसाठी सुधारित वेळ: सकाळी ९ ते ५
* दिवस: संपूर्ण आठवडा
* संचारबंदी: दररोज सायंकाळी ७ ते सकाळी ७ (सूट दिलेले व्यक्ती वगळता)
+ शारीरिक अंतर राखले नाही, तर दुकान बंद व पाच हजार दंड!
+ ग्राहक थांबून राहतील, अशी कोणतीही सेवा देता येणार नाही. फक्त पार्सल सेवा देता येईल. हॉटेल व इतर उपहार गृह यांना किचन सुरू ठेवता येईल.
+ शारीरिक अंतर ठेवले नाही/थुंकल्यास/मास्क न वापरल्यास प्रत्येकी एक हजार रुपये दंड लागणार
+ दुचाकीवर एक, ऑटो मध्ये चालक+२, चारचाकी वाहनात चालक+२ याप्रमाणे परवानगी
+ बसेससाठी ५० टक्के क्षमतेने चालविण्यास परवानगी
+ लग्न समारंभाची मर्यादा २० वरून ५० वर
* हे बंदच राहणार..
- चहा टपरी, पान ठेले
- विमान, रेल्वे प्रवास
- शाळा, कॉलेज, क्लासेस (ऑनलाईन व आंतर शिक्षण वगळून)
- शॉपिंग मॉल, सिनेमा हॉल
- सामाजिक/धार्मिक कार्यक्रम
- व्यायामशाळा, जल तरणिका
- सर्व धार्मिक स्थळे
- हॉटेल/रेस्टारंट/बार/धाबे
- आठवडी बाजार
- शीतपेयांची दुकाने
- तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थाची विक्री
वरील ठिकाणे वगळता गर्दी न होणारी इतर दुकाने एका वेळी जास्तीत जास्त पाच ग्राहक दोघांमध्ये सहा फूट शारीरिक अंतर राखून, दिलेल्या वेळेत, सुरक्षिततेची काळजी घेऊन सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून आदेशाची अवज्ञा केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे...
0 टिप्पण्या