💥परभणी जिल्हा शासकीय रुग्नालयात सोयीसुविधांसह साहित्याचा अभाव...! 💥शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षातील वैद्यकीय अधिकार्‍यांसह संतप्त परिचारिकांनी धरले धारेवर💥

परभणी/जिल्हा शासकीय रुग्नालयातील अनागोंदी व निष्काळजी कारभार आज उघड झाला असून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षातील वैद्यकीय अधिकार्‍यांसह परिचारीकांना संरक्षणाच्या दृष्टीने पुरेसे साहित्य प्रशासनाद्वारे उपलब्ध न केल्याबद्दल संतप्त परिचारिकांनी आज बुधवार दि.२७ मे रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांना अक्षरशः धारेवर धरले.
 कोरोना विरुध्दच्या लढाईत एक योध्दा म्हणून वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचार्‍यांसह परिचारीका संययितांसह कोरोनाबाधित रुग्णांची गेल्या दोन महिन्यांपासून अहोरात्र सेवा करीत आहेत. वैद्यकीय तपासण्यांसह योग्य तो औषधोपचार उपलब्ध करीत आहेत. असे असतांना आरोग्य विभागाद्वारे या अधिकार्‍यांसह कर्मचारी-परिचारिकांना पुरेश्या प्रमाणात मास्क, सॅनिटायझर्स, हॅन्डग्लोज किंवा पीपीई कीट्स वगैरे उपलब्ध करण्यात आले नाही. त्याचाच परिणाम आता परिचारिकांना सुध्दा भोगावा लागतो आहे. एक परिचारिका मंगळवारी कोरानाबाधित आढळून आली, असे या संतप्त परिचारिकांनी जिल्हा शल्य चिकित्सक नागरगोजे यांना निदर्शनास आणून दिले. संशयितांचा कक्ष, कोरोनाबाधित रुग्णांचा कक्ष वगैरेंमधील अपुर्‍या सोयीसुविधांबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी केली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक नागरगोजे यांनी अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेसंदर्भात निश्‍चितच दखल घेतली जाईल, साहित्य पुरविले जाईल, असे आश्‍वासन दिले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या