💥गंगाखेड मार्गावरील ब्राम्हणगांव फाट्याजवळील कापूस संकलन केंद्रावर कापूस खरेदीस मोठ्या प्रमाणावर विलंब..!
💥ब्रामणगांव फाट्यावर संतप्त शेतकर्‍यांनी केला रास्तारोको💥

परभणी/येथील गंगाखेड रस्त्यावरील ब्राम्हणगांव फाट्याजवळील कापूस संकलन केंद्रावर कापूस खरेदीस मोठ्या प्रमाणावर विलंब होत असल्याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी आज शुक्रवार दि.29 मे रोजी दुपारी जोरदार रास्तारोको केला.येथील एका जिनिंग प्रेसिंगच्या संकलन केंद्रावर गेल्या चार-सहा दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर कापसाची वाहने उभी आहेत, परंतू खरेदीत मोठा विलंब होतो आहे. या संदर्भात संबंधित अधिकारी-कर्मचारी कोणताही खूलासा करेनासे झाले असून त्यामुळेच कापूस उत्पादक शेतकर्‍यांना वाहन भाड्याचा नाहक आर्थिक फटका बसतो आहे. यास पूर्णतः यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप करीत संतप्त शेतकर्‍यांनी गोंधळास सुरुवात केली. पाठोपाठ त्या निषेधार्थ गंगाखेड ते परभणी रस्त्यावर ठाण मांडून जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकारानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली अन् संतप्त शेतकर्‍यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या पध्दतीने आंदोलने करु नका,असे नमूद केले. यावेळी संतप्त शेतकर्‍यांनी तातडीने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे धाव घेतली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या