💥पुर्णेकरांनो शासकीय निर्देशांचे पालन करा कोरोना विरोधातील लढाई आपणाला जिंकायची आहे..!



💥पुर्णा नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती व शिवसेना नगरसेवक राजेश भालेराव यांनी केले जनतेला आवाहन💥

पुर्णा/शहर व तालुक्यात पाहाता पाहाता 'कोरोना व्हायरस'जागतिक महामारीने प्रवेश केल्याचे निदर्शनास येत असून शहर व ग्रामीण भागातील जनतेने राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री.उध्दवजी ठाकरे साहेब व जिल्हा प्रशासनाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करून कोरोना व्हायरस विरोधातील लढाईत मुख्यमंत्री साहेबांचे हात बळकट करावे.जनतेने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे घराबाहेर निघतेवेळी नागरिकांनी तोंडावर मास्क लावल्या शिवाय बाहेर पडू नयें,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे,संचारबंदीचे पालन करून दोन पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्रित येणे टाळावे असे आवाहन पुर्णा नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती तथा जेष्ठ विधितज्ञ ॲड.राजेश भालेराव यांनी केले असून शहरातील युवकांनी शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या कोल्हापूरी बंधारा परिसरात पोहण्यास जाऊ नयें तसेच पाणलोट क्षेत्र  सार्वजनिक विहीर व पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहीण्यांचा वापर स्नान करण्यासाठी टाळावा व आदी परिसरात स्वच्छता राखावी तसेच रेड झोन जिल्ह्यातून येणाऱ्या नातेवाईक मित्र परिवार गावकरी आदींची माहिती प्रशासनापासून लपवू नयें व स्वतःहून प्रशासनास माहिती द्यावी असे आवाहनही त्यांनी शहर व ग्रामीण भागातील जनतेला केले असून भविष्यात लॉक-डाऊन वाढण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी अनावश्यक खर्च टाळावा तसेच अनावश्यक प्रवासही टाळावा तसेच लग्न समारंभ किंवा अन्य सार्वजनिक कार्यक्रमास जाणे टाळावे असेही आवाहन ॲड.राजेश भालेराव यांनी केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या