💥परभणी महानगर पालिकेने नानलपेठ पोलीस स्टेशन केले सील ...! 💥पोलीस वसाहतीतील इमारतीसह अन्य परिसरात निर्जंतूकीकरणाचे कामही युध्द पातळीवर💥 

परभणी,दि.25/येथील नानलपेठ पोलीस स्थानकात कार्यरत एक पोलीस कर्मचारी कोरोना पॉझेटीव्ह आढळून आल्याच्या पार्श्‍वभूमीवर परभणी महानगर पालिका प्रशासनाने आज सोमवार दि.२५ मे २०२० रोजी सकाळी नानलपेठ पोलीस स्टेशनच सील केले. या पाठोपाठ तात्काळ पोलीस वसाहतीतील त्या इमारतीसह अन्य परिसरात निर्जंतूकीकरणाचे कामही युध्द पातळीवर हाती घेतले.

जिल्हा शासकीय रुग्णालयास रविवारी रात्री नांदेड येथील प्रयोग शाळेतून अहवाल प्राप्त झाल्या पाठोपाठ जिल्हा पोलीस दलातच खळबळ उडाली, कारण नानलपेठ पोलीस स्थानकातील एका कर्मचार्‍याचाच स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आला. महापालिका प्रशासनास सूचना मिळाल्या बरोबर अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी नानलपेठ भागातील पोलीस वसाहतीत धाव घेतली. तेथील बिल्डींग क्रमांक १९ चा संपूर्ण परिसर निर्जंतूकीकरण करून घेतला. पाठोपाठ नानलपेठ पोलीस स्थानकाचाही संपूर्ण परिसर सीलबंद केला.नानलपेठ पोलीस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच बेरीकेट्स लावून प्रशासनाने तेथील ये-जा थांबविली. या भागात सुध्दा फवारणीचे काम प्रशासनाने पूर्ण केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या