💥कावलगावाकडून पुर्णेकडे दुचाकीवरून जाणारा १४ हजार रुपयांच्या गोवा गुटख्यासह आरोपी ताब्यात💥
पूर्णा/तालुक्यातील चुडावा पोलीस प्रशासनाने कावलगावाकडून पुर्णेकडे दुचाकीवरून जाणारा १४ हजार रुपये किंमतीचा गोवा गुटखा चुडावा पोलीसांनी शुक्रवारी १५ रोजी पकडला.
तालुक्यातील गुटखा तस्कर नांदेड येथून गुटखा घेऊन कावलगांव चांगेफळ परिसरातून छुप्या मार्गाने गुटख्याची तस्करी करत असल्याची माहिती चुडावा पोलीसांना मिळाली. या माहीतीवरुन चुडावा पोलीस ठाण्याचे सपोनी शिवाजी देवकते यांच्या आदेशा नुसार कावलगांव बिट जमादार सुर्यकांत केजगीर, भारत सावंत,टोटेवाड आदींनी गुरुवारी १५ रोजी सकाळी कावलगावात सापळा रचुन नांदेड येथून पुर्णेकडे छुप्या मार्गाने एम.एच२२/एई/३०८४ या दुचाकीवरून एक तरुण गुटख्याने भरलेली बॅग घेऊन जात असताना दुचाकीसह पकडला. या बॅगेची पाहणी केली असता गोवा गुटख्याचे १४ हजार रुपये सुमारे ४० गोव्याचे पुडे आढळून आले.सदरील दुचाकीसह गुटखा ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही सिठीक याबाबत अन्न भेसळ प्रशासनास कळवण्यात आले आहे.
0 टिप्पण्या