💥पंकजाताई मुंडे यांनी दिले परळी,बीडच्या शासकीय रूग्णालयांना व्हेंटिलेटर्स...!



💥रॅडिको एनव्ही डिस्टिलरीचे कोरोनाच्या लढाईत महत्वाचे योगदान💥

बीड / परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. ०८  कोरोनाच्या लढाईचा सामना करण्यासाठी पंकजाताई मुंडे यांनी रॅडिको एनव्ही डिस्टिलरीतर्फे  बीड व परळी येथील शासकीय कोव्हीड रूग्णालयांना व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले आहेत, सदर व्हेंटिलेटर्स आज रूग्णालयांना सुपूर्द करण्यात आले.

  जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे बीड जिल्हयात कोरोनाचा आकडा सध्या शुन्य आहे. असे असले तरी सध्याची गंभीर परिस्थिती पाहता भविष्यातील काळजी म्हणून आणि परिस्थिती उद्भवल्यास अचानक कोणाची प्रकृती ढासळल्यास कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यासाठी व्हेंटिलेटर्सची आवश्यकता भासणार आहे, ही तातडीची गरज लक्षात घेऊन पंकजाताई मुंडे यांनी रॅडिको एनव्ही डिस्टिलरीच्या वतीने बीड जिल्हा रूग्णालयात तयार होत असलेल्या कोविड रूग्णालयास  तसेच परळीच्या उप जिल्हा रूग्णालयास व्हेंटिलेटर्स दिली आहेत. सदर व्हेंटिलेटर्स आज बीड येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ अशोक थोरात यांचेकडे तर परळी येथे भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख, तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, युवा नेते नीळकंठ चाटे, राजेंद्र ओझा, नगरसेवक प्रा. पवन मुंडे, विजयकुमार खोसे आदींनी वैद्यकीय अधीक्षक डाॅ दिनेश कुरमे यांच्याकडे  सुपूर्द केले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ मोरे, डाॅ. अर्शद शेख, डाॅ. रामधन कराड  उपस्थित होते.

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा मदतीचा ओघ सुरूच!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या मदतीचा ओघ संपूर्ण महाराष्ट्राभर अजूनही सुरूच आहे. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी  परळी शहरासह बीड जिल्हयात तसेच बाहेरगावी अडकलेल्या गरजू नागरिकांना तसेच ऊसतोड कामगारांना किराणा साहित्याचे तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. मुंबई, पुणे, औरंगाबाद यासह राज्याच्या इतर भागात अनेक लोक अडकले आहेत, त्यांना देखील प्रतिष्ठानकडून अजूनही मदत  चालूच आहे. आता कोरोनाच्या रूग्णांची काळजी म्हणून पंकजाताई मुंडे यांनी रुग्णालयांना व्हेंटिलेटर्स दिल्याने रूग्णांची मोठी सोय झाली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या