💥चोरट्या रेतीची तस्करी करणाऱ्या विरोधात उपविभागीय अधिकारी व्यंकट कोळींची धाडसी कारवाई💥
सोनपेठ/प्रतिनिधी
कोरोना या आजाराच्या वाढत्या संक्रमनाने प्रशासन नियोजनाच्या तयारीत असतानाच अवैध व्यवसायिक मात्र आपले उखळ पांढरे करण्यात दंग असल्याचे चित्र दिसून येत आहे.यामुळेच पाथरी तालुक्यात अवैध वाळू उपस्याच्या प्रमाणात वाढ होत आहे.रात्री-बेरात्री होणाऱ्या या वाळू वाहतुकीने सामान्य नागरिकांच्या झोपेचा खेळखंडोबा होत असल्यानेच ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी गोपनीय तक्रारी करण्याचा सपाटा चालवला आहे.तक्रार मिळताच उपविभागीय अधिकारी व्यंकट लिंबू कोळी यांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर कार्यवाही करण्याचा धूमधडाका चालवला आहे.
उपविभागीय अधिकारी कोळी हे कार्यवाही करण्यासाठी रात्रीचे जेवणही प्रवासातच करत असल्याची माहीती मिळतेय,या होणाऱ्या कार्यवाह्यांमुळे कोळी यांचे सामान्यातून कौतुक होत असून सामान्यांचा अधिकारी अशी त्यांची ओळख झाली आहे.याबाबत अधिक माहीती अशी की,पाथरी तालुक्यात रात्री बेरात्री अवैध वाळू उपसा जोमात चालु आहे.बहुतांश गावातील गावाची सुरक्षा ज्यांच्यावर असते अशा ग्रामसुरक्षा दलाच्या पदाधिकाऱ्यांनीही या अवैध वाळू उपसा करण्यात स्व:तला गुंतवले असल्याच्या गोपनीय तक्रारी प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात होत आहेत.प्रशासनाने मात्र या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून आता या ग्रामसुरक्षा दलाच्या पदाधिकाऱ्यावर कार्यवाही होईल काय?असा सवाल सामान्यातून व्यक्त केला जात आहे.अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर कडक कार्यवाही करण्याच्या सुचना कोळी यांनी यापूर्वीच प्रशासनाला दिलेल्या आहेत.मात्र चेरीमेरीचा कारभार करणाऱ्या पाथरीच्या स्थानिक प्रशासनाने या काळे कारनामे करणाऱ्या व्यावसायिकांना पाठीशी घालून आपले उखळ पांढरे करुन घेतले आहे.मात्र कोळी यांनी कार्यवाही करण्याचा धूमधडाका चालवला असून सोमवार दी.२५ मे रोजी गोपनीय माहीती मिळताच गोदावरी नदीतून वाळू उपसा करत वाहतूक करणाऱ्या ट्रक्टरवर सारोळा रोडवर कार्यवाही केली आहे.मात्र कार्यवाहीच्या भीतीने सदर ट्रक्टर ड्रायव्हरने पळ काढताच कोळी यांनी एका ड्रायवहरच्या सहाय्याने ट्रक्टर पाथरी पोलीस स्थानकात लावत कार्यवाही केली आहे.करण्यात आलेल्या या कार्यवाहीमुळे अवैध वाळू व्यावसायिकांचे धाबे दनाणले आहेत......


0 Comments