💥परळी तालुक्यातील दैठणाघाट येथील स्मशानभुमी परिसरात आढळले स्त्री जातीचे जिवंत अर्भक...!



💥सदर बाळाला उपचारासाठी धर्मापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले💥

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- 
 तालुक्यातील दैठणाघाट येथील स्मशानभूमीच्या परिसरामध्ये स्त्री जातीचे जीवंत अर्भक सापडल्यामुळे खळबळ उडाली असून बाळाच्या रडण्यामुळे लोकांचे लक्ष गेल्याने वाळाचे प्राण वाचले आहेत. सदर बाळाला उपचारासाठी धर्मापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आलेले आहे.
     
परळीपासून १८ ते २० किलोमिटर अंतरावर असलेल्या दैठणाघाट या गावातील स्मशानभूमीच्या जवळ असलेल्या झुडपांमध्ये नुकतेच जन्मलेले अर्भक फेकुन देण्यात आले होते. दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान बाळाच्या रडण्याचा आवाज जबळच सुरू असलेल्या एका बांधकामावरील लोकांना ऐकावयास मिळाल्यानंतर मिस्त्री व मजूरांना झुडपांकडे धाव घेऊन पाहीले असता कसलाही कपड़ा अंगावर नसलेले जीवंत स्त्री जातीचे अर्भक रडत असल्याचे त्यांना दिसून आले. सदर लोकांनी याची माहिती आशा वर्कर असलेल्या कल्पना भागवत गुट्टे या महिला दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जावून बाळाला झुडपातून बाहेर काढत त्याला कपड्यामध्ये गुंडाळून धर्मापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. विशेष म्हणजे सदर बाळाचे वजन हे दोन किलोच्या आसपास असल्याचे सांगितले जात असून त्यामुळे सदर बाळाचा जन्म हा ९ महिन्यानंतरच झालेला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सदर बाळ हे १२ ते १५ तासात जन्मलेले असावे असा अंदाज लावला जात आहे.
 
      तालुक्यातील मौजे दैठण घाट येथील समस्यानभुमी परिसरातील झाडी झुडपातून सकाळी मुलीच्या रडण्याचा आवाज बाजूच्या लोकांना आला. त्याठिकाणी नागरीकांनी धाव घेतली असता. त्यांना जिवंत मुलगी आढळून आली. रात्रीच्या दरम्यान अज्ञात मातेने या स्त्री जातीचे अर्भक फेकून दिले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही मुलगी अनैतिक जन्मातून जन्मली की मुलगी झाली म्हणून फेकून दिली या बाबतची चर्चा गावात होत असून मुलीस धर्मापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या