💥परभणी जिल्ह्यात पुन्हा सहा कोरोना बाधित रुग्न आढळले...!



💥कोरोना बाधीत ६ रुग्नांमध्ये पुर्णा-सेलू-गंगाखेड-मानवत या तालुक्यातील रुग्णांचा समावेश💥

परभणी/जिल्ह्यात आज शुक्रवार दि.२९ मे रोजी दुपारी जितूर तालुक्यातील वाघी बोबडे येथील व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याच्या घटने नंतर अवघ्या काही तासातच नांदेड प्रयोगशाळेकडून रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखीन सहा कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे.  
नांदेड येथील प्रयोगशाळेतून आलेल्या अहवाला नुसार कोरोना बाधीत ६ रुग्नांमध्ये परभणी जिल्ह्यातील पुर्णा-२,सेलू(ब्रम्हवाडी)-१,गंगाखेड-१,मानवत-१,जिंतूर(वाघी बोबडे)१,या तालुक्यातील अश्या ६ रुग्णांचा समावेश आहे. एकूण जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ७४ इतकी झाली आहे.


आज शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत नांदेड येथील प्रयोग शाळेत एकूण ३०९ व्यक्तीचे अहवाल प्रलंबीत होते. सकाळी एकूण ३८ जणांचे अहवाल प्राप्त झाले त्यात एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आला. परंतू प्रलंबीत ३०९ स्वॅबच्या अहवालाकडे जिल्हा प्रशासनाचे व आरोग्य विभागाचे लक्ष केंद्रीत झाले होते. नांदेड येथील प्रयोगशाळेवर नांदेड,हिंगोली व परभणीचाही ताण आल्याने तेथून स्वॅबचे अहवाल मिळण्यास मोठा विलंब होतआहे. त्यामुळे जिल्हा शासकीय यंत्रणेत तसेच संशयितांसह नातेवाईकांत सुध्दा प्रचंड अस्वस्थता पसरत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या