💥परीक्षा रद्द करून शासनाने विद्यार्थ्यांच्या मनावरील दडपण केले दूर..!💥विद्यार्थी नेते कुणाल कोल्हे यांच्या मागणीला यश💥

नांदेड :- गणेश शिंदे

कोरोना मुळे अनेक विद्यार्थ्यांच्या मनावर फार मोठे दडपण आले होते..
आणि विद्यार्थी विचार देखील करत होते. की परीक्षा होणार का नाही हा मोठा संभ्रम निर्माण झाला होता.
विद्यार्थ्यासाठी साठी सतत झटत असणारे व विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे विद्यार्थी नेते कुणाल कोल्हे यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षणमंत्री यांना निवेदनाद्वारे सतत पाठपुरावा करून विद्यार्थ्यांमध्ये होणारी घालमेल लक्षात आणून दिली.
व त्याचबरोबर अनेक सामाजिक संघटना शैक्षणिक संघटना शिक्षक संघटनेने देखील प्रशासनाला आणि शासनाला पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा संदर्भातील अडचणी लक्षात आणून दिल्या व परीक्षा रद्द करावी अशी मागणी लावून धरली होती.
ही मागणी मान्य  झाल्याबद्दल  व कुणाल कोल्हे यांनी केलेल्या मागील यश आल्याबद्दल  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उच्च शिक्षणमंत्री श्री उदय सामंत साहेबांचे आभार मानले आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या