💥परभणी जिल्ह्यातील दोन गावे आज प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत...!💥जिल्हादंडाधिकारी  दिपक मुगळीकर यांनी आदेशान्वये घोषीत केले💥

            परभणी,दि.20 :- जिल्ह्यात फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 व साथरोग प्रतिबंध कायदा 1897 नुसार गंगाखेड तालुक्यातील मौजे नागठाणा व परभणी तालुक्यातील पिंपळगाव ठोंबरे या दोन गावांमध्ये कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्याने ही गावे बुधवार दि. 20 मे 2020 रोजीच्या सायंकाळी 7 वाजेपासून पूढील आदेशापर्यंत  प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी तथा  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दी.म.मुगळीकर यांनी आदेशान्वये घोषीत केले आहे.
         प्रतिबंधीत क्षेत्राच्या हद्दीत ग्रामपंचायत व संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रमुखांनी सिल कराव्यात . त्यानुसार सदर सिल केलेल्या हद्दीत जीवनावश्यक वस्तू  ग्रामपंचायतीने व वैद्यकीय सेवा आरोग्य विभागाने पूरवाव्यात यासाठी जीवनावश्यक वस्तू , पूरवठा व वैद्यकीय सेवा सुरळीत राहण्याकरीता ग्रामपंचायत, आरोग्य विभाग कर्मचारी व त्यांची वाहने वगळता अन्य व्यक्तींना प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यास तसेच बाहेर पडण्यास बंदी करण्यात येत आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या घराबाहेर पडण्यास बंदी करण्यात येत आहे. सदर क्षेत्रामध्ये ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात यावे. याशिवाय संचारबंदी लागू केलेल्या भागात इतर कोणतीही व्यक्ती अथवा वाहने रस्त्याने , बाजारामध्ये , गल्लीमध्ये , घराबाहेर फिरताना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल. सदरील आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारीही पोलीस अधिक्षक, उपविभागीय दंडाधिकारी , सहाय्यक आयुक्त अन्न व प्रशासन परभणी , तालुका दंडाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी  यांच्यावर राहील. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
               -*-*-*-*-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या