💥परभणी जिल्ह्यातील नागरिकांनो मद्य खरेदी नोंदणीसाठीच्या अनाधिकृत लिंक पासून सावधान रहा...!



💥परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाने दिला सावधानतेचा इशारा💥

        कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर कोरोना विषाणुचा प्रसार होऊ नये यासाठी परभणी जिल्ह्यात मद्य खरेदीसाठी होणा-या गर्दीचे नियमन होण्यासाठी मद्य खरेदी करु इच्छीणा-या नागरीकांची नोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
तथापी या लिंकसारखीच फेक लिंक सोशलमिडीयावर व्हायरल झाल्याचे निदर्शनास आले आहे. सर्व नागरीकांनी मद्य खरेदीसाठी अधिकृत लिंक वरुनच अर्ज करावेत. बनावट लिंक वरून माहिती भरल्यास आणि  त्याद्वारे नागरीकांची फसवणूक झाल्यास जिल्हा प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही याची नागरीकांनी नोंद घ्यावी.
अधिकृत लिंक पुढील प्रमाणे आहे. https://forms.gle/sFSw7NrgtYY62kHMA तसेच हीच  लिंक परभणी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर https://parbhani.gov.in/  उपलब्ध आहे. नागरीकांनी  अधिकृत प्रणालीचा वापर करावा आणि बनावट लिंक पासून सावध राहावे असे  आवाहन करण्यात येत  आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या