💥पुर्णा तालुक्यातील आहेरवाडी शिवारात वाळूसह दोन टिप्पर जप्त...!💥पोलीसांनी एकूण 14 लाख 68 हजारांचा मुद्देमाल केला जप्त💥

पुर्णा/तालुक्यात लॉक-डाऊन व संचारबंदी काळातही पुर्णा-गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उत्खनन मोठ्या प्रमाणात होत असून जिल्ह्यासह पुर्णा तालुक्यात ही सर्वत्र कडक नाकाबंदी असतांना असंख्य वाहनांतून या चोरट्या वाळूची तस्करी होत असल्याचे पुर्णा पोलीस प्रशासनाने गुरुवार दि.28 मे 2020 रोजी मध्यरात्री कात्नेश्वर भागातील आहेरवाडी फाट्यावर कारवाई वरून निदर्शनास येत आहे.
पूर्णा पोलिसांनी गुरूवारी मध्यराञी वाळुची वाहतूक करणारे दोन टिप्पर पकडून सहा ब्रास वाळूचा साठा व दोन टिप्पर जप्त केले.त्या पाठोपाठ एक कार व मोटारसायकल ही ताब्यात घेतली. पोलिसांनी दोन टिप्पर चालक,दोन टिप्पर मालक व अन्य एका व्यक्तीस ताब्यात घेतले आहे.या कारवाईत पोलीसांनी एकूण 14 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त केला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या