💥ताडकळस पोलीस स्थानकाच्या हद्दीत उपविभागीय अधिकारी पाटील यांची धडाकेबाज कारवाई....!💥ताडकळस मधील नाकाबंदीवर प्रश्नचिन्ह,खरबडा-धानोरा काळे येथे रेती-मुरुमाचे ३ टँक्टर जप्त💥 

पुर्णा/तालुक्यातील ताडकळस पोलीस स्थानकाच्या हद्दीत अवैध गौण-खनिज उत्खननासह अवैध मुरूम रेती तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येत असून कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह तालुक्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य वस्तू अथवा मालाच्या वाहतूकीवर संपुर्णतःहा बंदी घालण्यात आलेली असतांना देखील ताडकळस येथून जवळच असलेल्या खरबडा येथील येथील गोदावरी नदीच्या पात्रातून राजरोसपणे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीचे उत्खननासह या चोरट्या रेतीची वाहतूक होत असतांना ताडकळस पोलीस प्रशासनाची नाकेबंदी फोल ठरत आहे.अश्याच प्रकारे अवैध गौण-खनिज रेती-मुरूमाची वाहतूक करणारे १ टँक्टर रेतीसह गंगाखेड उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या सूचनेनुसार जप्त करत तहसीलकार्यालयात जमा केले असून धानोरा काळे येथे अवैध मुरुमाची वाहतूक करणारे २ टँक्टर जप्त करुन ताडकळस पोलीस ठाण्यात जमा केले आहेत. या दोन्ही कारवाई गंगाखेड उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की गत काही दिवसांपासून गोदावरी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची वाहतूक करण्यात येत आहे. या प्रकारामुळे शासनाचा महसूल बुडत असुन लाखो रुपयांचा फटका शासनाला बसत आहे. गंगाखेड उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी मात्र गत काही दिवसांपासून अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ताडकळस पासून जवळच असलेल्या खरबडा येथील गोदावरी नदीच्या पात्रातून पहाटे अवैधरित्या रेतीचा उपसा करून वाहतूक करणारे टँक्टर गुरुवार दि.२१ मे २०२० रोजी सकाळी ०६-०० वाजता उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या सुचनेनुसार तलाठी जालणे, नंदकिशोर शेलाटे, शिवप्रसाद देवणे, मुरलीधर मोरे या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विना नंबरचे टँक्टर पकडुन तहसील कार्यालय पुर्णा येथे जमा केले आहेत.तर भर दुपारी १२-०० वाजेच्या सुमारास धानोरा काळे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील मुख्य रस्त्यावर दोन टँक्टर मुरुमाची अवैध वाहतूक करणारे जप्त करुन ताडकळस पोलीस ठाण्यात जमा केले आहेत. याप्रकरणी दि.२३ मे २०२० च्या सायकांळी उशिरा पर्यंत ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलीस स्थानकाचे कर्मचारी सुरनर यांनी सांगितले.दरम्यान उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या कारवाईमुळे गत काही दिवसांपासून अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्यांची धाबे दणाणले आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या