💥हिंगोली जिल्हा शिवसेना संस्थापक सदस्य माननीय गजाननराव घुगे....!



💥लेखक-सतीश सातोनकर- ओळख शिवसेनेच्या पक्षनिष्ठ ढाण्या वाघांची💥

..... परभणी हिंगोली जिल्ह्यांमध्ये जि बोटावर मोजण्याइतके ,श्रीमंत ,संपन्न, स्थानिक शिवसेना नेते होते त्यापैकी गजाननराव घुगे साहेब हे महत्त्वाचं नाव, प्राचीन महादेवाच्या मंदिरासमोर अत्यंत सुगंधित असं गुलाबी चाफ्याचं दुर्मिळ झाड, ज्या पक्षाला सतत फुलांचा बारमाही बहार असतो, पाणी मग मंदिर परिसरामध्ये दोन काम होतात एक तर देवाला लागणारी फुले ही मिळतात आणि भक्तांना समस्त प्रसन्न वातावरणामध्ये एकाग्रता साधता येते तसं शिवसेना नावाच्या शिवालया समोरचं हे प्रसन्न व्यक्तिमत्व इतरांनाही प्रसन्नता वाटणार, या जगामध्ये फार कमी लोक इतरांना आनंद देण्याचा स्वभाव ठेवतात, अत्यंत सुसंस्कारित कुटुंबात जन्माला आल्यानंतर हिंगोलीच्या व्यापार पेठेमध्ये व्यापारी म्हणून एक प्रतिष्ठित असं स्थान निर्माण करणारे गजाननराव घुगे साहेबांचा व्यक्तिमत्व  सर्व सहकाऱ्यांना सतत ऊर्जा देणारा प्रचंड मोठा उर्जास्त्रोत व संकटसमयी सर्वार्थानं पाठीमागे उभा राहणारा सखा म्हणून , तर नोक-या तरुण कार्यकर्त्यांना आपला मित्र वाटणारा हा नेता डोंगरातून वाहणाऱ्या  निखळ अवखळ पाण्यासारखा स्वच्छ स्फटिकासारखे चारित्र्यसंपन्न होय सार्वजनिक जीवनामध्ये चारित्र्य जोपासणे ही बाब राजकारणामध्ये अत्यंत कठीण आहे परंतु गजाननराव घुगे साहेबांनी अत्यंत जी करिने जोपासून दाखवली म्हणून त्यांना लोक प्रेमाने दादा असे संबोधतात, एकदा मन अंतर्बाह्य स्वच्छ असलं की तुम्हाला कोणाचीच भीती वाटत नाही हीच बाब या माणसाची सार्वजनिक जीवनातली सगळ्यात मोठी ताकत आहे, निस्वार्थपणे शिवसेनेच्या स्थापनेपासूनच शिवसेनेमध्ये सक्रियता, स्वभावातील शीतलता व प्रसन्नता, लहानातल्या लहान कार्यकर्त्याला ही बापू ,माय,  राजेहो, या उपाधीने सन्मानित करणार प्रेम, करणार आदर करणार, पक्षाने कुठली जबाबदारी टाकू अथवा न टाकू परंतु पक्षासाठी चोवीस तास उपलब्ध राहणे शिवसेना माझे कुटुंब आहे वंदनीय शिवसेनाप्रमुख माझ्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. व संपर्क प्रमुख शिवसेना नेते दिवाकर रावजी रावते साहेब आम्हा शिवसैनिकांचे पालक आहेत, शिवसेनेच्या मूळ तत्वाला कडवट  नियमांचे कठोर पालन करून घुगे साहेब शिवसैनिकांच्या गळ्यातले ताईत झाले, संघटनेला सगळ्यात मोठा जर कुठला आत्मा असेल तर तो आहे आपल्या सहकाऱ्यांकडून आदर घेत असताना तो त्यांच्या मनातून आला पाहिजे त्यांच्यावर थोपला नाही पाहिजे आणि जे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आपला आदर निर्माण करतात ते भविष्यात त्या संघटनेचे भविष्य अत्यंत उज्ज्वल करतात होय आदरणीय गजाननराव घुगे दादांनी शिवसेनेच्या पडझडीच्या व अत्यंत कठीण राजकीय प्रसंगांमध्ये शिवसेनेला पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका ग्रामपंचायत, इतकेच काय व्यापारी महासंघाचे पदाधिकारी, त्यातून सहकारातील निवडणूक लढवणारे परभणी जिल्ह्यातले शिवसेनेचे पहिले नेते त्यांच्याबरोबर शिवसेनेचे खासदार एडवोकेट शिवाजीराव माने साहेब यांचाही मोलाचा सहभाग राहिला परभणी जिल्हा एकत्रित असताना परभणी जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवर भगवा फडकवत असताना तीन नाव समोर येत होती  पाथरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हरिभाऊ लहाने साहेब, एडवोकेट शिवाजीराव माने साहेब, व गजाननराव घुगे साहेब, परभणी जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा भगवा फडकवत असताना जिल्हापरिषद आणि पंचायत समिती ताब्यात घेत असताना साहेबांनी परभणी हिंगोली जिल्ह्याची बैठक औंढा नागनाथ येथील शासकीय विश्रामगृहावर ठेवली होती वह्या त्रिमूर्ती चा मोठा सत्कारही घडवून आणला होता, त्याकाळी शिवसेना संपर्कप्रमुख नेत्यांकडून सत्कार होणे हा फार मोठा सन्मानाचा विषय होता, कारण त्याकाळी परभणी हिंगोली जिल्हा एकच होता आणि मग ज्याने त्यांना सन्मानित केले त्यांचा सन्मान शिवसैनिकांमध्ये अनुकरणीय असायचा, कार्यकर्त्यांमध्ये शिवसैनिकांमध्ये  आपल्या सन्मानित नेत्यांचा आदर वाढत राहायचा, हे सर्व करत असताना गजाननराव घुगे साहेब हे तालुकाप्रमुख होते, पक्षाच्या प्रचंड पडझडीच्या काळामध्ये, काँग्रेसने पक्षांतराचा डाव टाकून शिवसेना संपवून टाकण्याचा डाव रचला होता, परंतु एडवोकेट प्रल्हादराव उमरेकर पाटील साहेब, शिवाजीराव माने साहेब, गजाननराव घुगे साहेब, सोबतीला शिवसेनेचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व वसमत चे लोकप्रिय आमदार डॉक्टर जयप्रकाश मुंदडा  साहेब  होतेच की, सार्वजनिक जीवनामध्ये मराठवाड्यातलं अत्यंत संयमी ,मितभाषी, व सतत हसमुख व्यक्तिमत्व, कार्यकर्त्यावर मातृतुल्य प्रेम करणार, पित्र तुले प्रेम करणार तृतीय व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय डॉक्टर जयप्रकाश मुंदडा साहेब, डॉक्टर जयप्रकाश मुंदडा साहेबांच्या बाबतीत सांगायचे झाले तर निश्चयाचा आणि संयमाचा  हिमालयच म्हणावा लागेल, परभणी जिल्ह्यातला शिवसैनिक डॉक्टर जयप्रकाश मुंदडा  साहेबावर जीव ओवाळून टाकत होता, आणि त्यांचा जीव गजाननराव घुगे  साहेबां मध्ये अडकलेला, तेहतीस वर्षाच्या शिवसेनेच्या आयुष्यामध्ये या दोघांमधल्या आदर संबंधांमध्ये राजकारणातील हेवेदावे चढ-उतार जय-पराजय कधीच आले नाही, राजकीय जीवनातली किंवा राजकारणातली ही एक आदर्श घेण्यासारखी आणि दुर्मिळ अशी घटना आहे, सामान्य कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्याला खूप काही शिकण्यासारखे आहे, कोणाचाही द्वेष मत्सर केल्याने आपण मोठे होत नाही, व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनामध्ये शत्रूचा आदर केला पाहिजे हा धडा त्यातून मी घेतला, गजाननराव घुगे साहेब हे जन्माने वारकरी संप्रदायाचे पायी वारी करणे त्यांनी कधी सोडले नाही, पद संपत्ती याच्या मर्यादा त्यांनी ओलांडून आपली प्राचीन भगवंताची  वारकरी  प्रज्ञा ची परंपरा कायम ठेवण्यासाठी आपला सहभाग देत असतात, भुकेल्या माणसांना जेऊघाले हे या माणसाचा सगळ्यात मोठा गुणधर्म आहे, अडीअडचणीला नटलेल्या माणसाच्या जवळ जाऊन हळूच त्याच्या हातामध्ये हजार पाचशे रुपये ठेवणार, एखादी गोष्ट पटली नाही मग त्यांच्यातला संयमी या देशाचा कोणी उल्लंघन केले मग मात्र महादेवाचे तिसरे नेत्र उघडणारा माणूस, समोरच्याची मग कुठलीच भीडभाड न ठेवता त्याला समजणाऱ्या किंवा तो बोलतो त्या भाषेमध्ये बोलण्याची ताकद असणारा हा शिवसेनेचा अत्यंत कणखर नेता  अशी  प्रचिती महाराष्ट्रभर आहे, "नाठाळाच्या माथी मग नक्की काठी" सतत जमिनीवर पाय असलेले या व्यक्तिमत्वाला शिवसेनेच्या सर्वोच्च  नेत्यांचे प्रेम लाभले, वंदनीय शिवसेनाप्रमुख यांचा अत्यंत लाडका कार्यकर्ता म्हणून गजाननराव घुगे साहेबांचा आजही उल्लेख होतो कार्यकर्ते त्यावर आजही चर्चा करतात,

 आदरणीय गजाननराव घुगे दादांना विधानसभेची उमेदवारी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आदरणीय दिवाकर रावते साहेब वंदनीय शिवसेनाप्रमुख यांच्या आदेशामुळे लढवावी लागली हे फार कमी लोकांना माहीत असेल, महाराष्ट्रामध्ये जे आदरणीय दिवाकर रावते साहेबांना ओळखतात रावते साहेब विदर्भातल्या आमदारांना एकदा असे म्हणाले होते की तुम्हाला माझ्यासारखा फटकळ माणूस पायचा का रे बाबा कळमनुरी ला जाऊन दोन दिवस थांबा मग तुम्हाला कळेल शिवसेनेचा आमदार कसा फटकळ आणि स्पष्ट आणि कष्टाळू असतो याचं प्रशिक्षण घ्या, त्याकाळी विदर्भात शिवसेनेचे 19 आमदार होते ते हिंगोली मध्ये घुगे साहेबांना भेटण्यासाठी व दोन दिवस त्यांचा सहभाग पवार संपर्क मिळावा म्हणून दोन दिवस मुक्काम नाही करून गेले होते, साहेबांनी त्यांना परत गेल्यावर विचारले कशा वाटले तुम्हाला आमचे मराठवाड्यातले घुगे साहेब.. आतील सन्माननीय आमदार साहेबांचे उत्तर अतिशय सुंदर होते साहेब "जसा गुरु तसा चेला" 80 टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या शिवसेनेच्या मुख्य तत्वानुसार वागणारा प्रत्येक शिवसैनिक महाराष्ट्रात आहे, परंतु माझा गजानन हा 100% समाजसेवाच अशी शिवसेना राबवणारा महाराष्ट्रातला एकमेव आमदार आहेत, सकाळी हे उत्तर अमरावती विश्रामगृहात ऐकण्याचे भाग्य मला लाभले म्हणून त्याचा उल्लेख आदमी करत आहे, मग पक्षाने दिलेली जबाबदारी आमदार म्हणून विकासाच्या संदर्भामध्ये सर्वात जास्त पत्र व्यवहार करणारे आमदार म्हणून गजानन रावांचा संसदीय कामकाजामध्ये उल्लेख आहे, सन्माननीय आमदार पदी गजाननराव घुगे विधिमंडळाच्या वेगवेगळ्या समित्यांवर ती काम करत राहिले , एक चांगला उत्तम संसदपटू म्हणून हे उल्लेख होतो, लोकशाहीमध्ये सामान्य गोरगरीब आदिवासी ,उपेक्षित कष्टकरी अठराविश्व दारिद्र्यात अडकलेला कोरडवाहू शेतकरी, वर्गामध्ये गजाननराव घुगे साहेबांचा व्यक्तिमत्त्व अत्यंत लोकप्रिय आहे आमदार असो अथवा नसो पदान पेक्षा माणसाची पत मोठी असते , हे राजकारणातलं समाजकारण आतलं बाळकडू मिळालेलं ओके साहेबांचं परखड व्यक्तिमत्व,  चिनी महामारी करोना ग्रस्त  महामार्ग च्या नावाने माणसांचा थरकाप उडतो, हा माणूस उपेक्षितांच्या पिचलेल्या गोर-गरीब, आधारहीन,  पीडित, सोशीत वर्गाचं दूःख माहीत असल्यामुळे लोक डाऊन मुळे आता लोकांना खायलाही नसेल याची जाणीव असणे, आपल्या मतदारसंघांमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये नेमका कोण उपाशी असेल नेमकं कोणाकडे खायला नसेल हे हेरणे एवढे सोपे नाही बरं, त्याला समाजसेवेच्या चिंतनाचे वेड लागावं लागतं, छातीमध्ये संवेदना असलेलं रुदय लागतं, काल लोक लोकांना खाद्यपदार्थ वाटत आहेत, ,छटाकभर भजे वाटून किलो वरचा फोटो पेपरात छापून आणतात ,तेव्हा आदरणीय  गजाननराव घुगे साहेबां सारख्या 100% समाजकारणाच्या विद्यापीठातून माझ्यासारखा विद्यार्थी एकच शिकतो, जितने जादे फल हो पेड को होत नाही ज्यादा झुकना पडता है, !जीवन का यही सत्य है ! जिस पेड के फल ज्यादा मीठे हो,!  उशी फलदार पेड को ज्यादा पत्थर खाने पडते है! जिस पेड पर ज्यादा पत्थर फेको आपको पत्थर नही! पत्थरों के बदले मीठे फल देता है!

 आदरणीय दादा उगवता सूर्य अथांग समुद्र नक्षत्राच्या पहिल्या थेंबावर जगणाऱ्या चातका वर कोण बरे उत्तम लिहू शकला, या सर्वांचे वर्णन करू शकला, हे सर्व अंतहीन अनंत आहे परोपकार धर्माची मानवसेवा हा वारकरी संप्रदायाचा वारसा जोपासणाऱ्या राजकारणातील वारकऱ्याला , राजासारखा रदय असणाऱ्या आमच्या जुन्या सहकाऱ्याला आम्हा सर्व जुन्या शिवसैनिकांचा फरशी सलाम.... क्रमशः.... भाग पहिला,

  लेखक: सतीश satonkar.
  कृपया लोक डाऊन मुळे शुद्ध लेखनातील चुका आपण समजून घ्याव्यात ही विनंती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या