💥परळीतील तेली युवक संघटना व तेली समाजाच्या वतीने समाजातील नागरिकांना किराणा साहित्य वाटप...!



💥समाजातील गोरगरीब, हातावर पोट असलेल्या समाजबांधवांना किराणा साहित्याचे वाटप💥 

परळी वैजनाथ दि.११ (प्रतिनिधी) :-  कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसरा लाँकडाऊन घोषित केल्याने गोरगरीब, हातावर पोट असलेल्या नागरिकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर येथील तेली युवक संघटना व तेली समाजाच्या वतीने समाजातील गोरगरीब, हातावर पोट असलेल्या नागरिकांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
                      देशात कोरोना विषाणूचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात तिसरा लाँकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लाँकडाऊन मुळे जिवनावश्यक वगळता सर्व व्यवहार, व्यवसाय बंद आहेत. यामुळे हातावर पोट असलेल्या गोरगरीब नागरिकांचे हाल होत आहेत.या पार्श्वभूमीवर तेली युवक संघटना व तेली समाजाच्या वतीने समाजातील हातावर पोट असलेल्या गोरगरीब नागरिकांना महिनाभर पुरेल असे किराणा साहित्य वाटप करण्यात आले आहे.यावेळी समाजातील सामाजिक भान असलेल्या दानशूर व्यक्तींनी मोलाची मदत केली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या