💥भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष धनराज गुट्टेंनी पंकजाताई मुंडे यांच्या समर्थनात दिला राजीनामा..!💥मा.मंत्री पंकजाताई मुंडे यांना विधान परिषदेचे तिकीट नाकारल्यानंतर प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात💥

मुंबई (प्रतिनिधी) :- भाजपने विधान परिषद निवडणुकीत माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांचे कट्टर समर्थक , भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष श्री धनराज गुट्टे यांनी त्यांच्या पक्षाच्या पदाचा पहिला राजीनामा देऊन पंकजाताई मुंडे यांना तिकीट नाकारल्याचा राग व्यक्त केला आहे . राज्यभरात अनेकजण राजीनामे देत आहेत पण पहिला नंबर लागला तो धनराज गुट्टे यांचा च ...
श्री गुट्टे हे माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांचे विश्वासू सहकारी व कट्टर समर्थक म्हणून गेल्या 12 वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहेत . श्रीमती मुंडे वर जर कुणी साधी टीका जरी केली तर गुट्टे महाराष्ट्र भर आंदोलन करून त्या व्यक्तीचा निषेध करतात. कट्टर समर्थक कसा असावा तर तो धनराज गुट्टे सारखा अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा असते . विधान परिषद तिकीट कापल्यानंतर पंकजा मुंडे साठी राजीनामे देणारे पाहिले मुंडे सैनिक ठरले आहेत धनराज गुट्टे .
त्याबद्दल सर्व मुंडे समर्थकाकडून त्यांचे कौतुक होत आहे . श्री गुट्टे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एकाच वाक्यात उत्तर दिले
' जगतोय ताई साठी मरणार ही ताई साठी' ' असे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या