💥परभणी जिल्हा रुग्णालयात 954 संशयितांची नोंद; आज 77 स्वॅब तपासणीसाठी पाठविले...!



💥एकुण ७७ स्वॅब स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले💥

          परभणी, दि.3 :- जिल्हयात कोरोना (कोव्हिड-१९) विषाणू बाधित एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नसून  रविवार दि.3 मे 2020 रोजी एकुण ७७ स्वॅब स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर परभणी येथील  जिल्हा रुग्णालयात पूर्वीचे ८७७ व आज दाखल झालेले  ७७ असे एकुण ९५४ संशयितांची नोंद झाली आहे.
          जिल्ह्यात आजपर्यंत एकूण संशयित 954 नोंद झाली असून आजपर्यंत घेण्यात आलेले स्वॅब एकूण 915 यापैकी निगेटिव्ह 818 तर पॉझिटिव्ह 1 आणि प्रलंबित स्वॅब 78 व तपासणीची आवश्यक नसलेले स्वॅब 18 याप्रमाणे आहेत. हॉस्पिटलमध्ये संसर्गजन्य कक्षातील 78, विलगीकरण केलेले एकूण रुग्ण 356, विलगीकरणाचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेले रुग्ण 520, परदेशातून आलेले 62 आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्ती 6 अशी वर्गवारी आहे. असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
            -*-*-*-*-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या