💥मृत महिलेच्या कुटुंबासह संपर्कातील 51 व्यक्तींचे स्वॅब निगेटीव्ह...!



💥परभणी जिल्हा प्रशासनाने सोडला सुटकेचा निःश्‍वास 💥

परभणी/सेलूतील त्या मृत महिलेच्या कुटूंबातील 8 संपर्कातील 19 असे एकूण 27 तसेच परभणीतील त्या रुग्णालयातील एकूण 24 असे एकूण 51 जणांसह अन्य असे एकूण71 जणांचे स्वॅब चा अहवाल निगेटीव्ह आला आहे. जिल्हा प्रसासनाने क्वॉरंटाईन केले. त्यांचे स्वॅब घेवून ते औरंगाबादमध्ये तपासणीसाठी पाठवले असता मृत महिलेच्या कुटुंबासह संपर्कातील 51 व्यक्तींच्या स्वॅबचे अहवाल शुक्रवारी दुपारी निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अक्षरक्षः सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.

नांदेडच्या रूग्णालयात उपचारा दरम्यान सेलूतील महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर जिल्हा महसुल, पोलिस व आरोग्य यंत्रणा कमालीच्या खडबडून जाग्या झाल्या होत्या.पाठोपाठ सेलुतील नगरपालिका व परभणीतील महापालिकेची यंत्रणा युध्दपातळीवर कामास लागली. सेलूत यंत्रणांनी संयुुक्तपणे सर्वप्रथम कुटुंबायातील सदस्यांना क्वारंटाईन केले. तेथील रुग्णालयात रवाना केले. पाठोपाठ त्यांचे स्वॅब घेतले. राजमोहल्ला नावाचा परिसर सीलबंद केला. आणि युध्दपातळीवर सर्व्हेक्षण सुरू केले. तर परभणीत ती महिला परभणीतही एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दोन तास थांबल्याची माहिती कळाल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने बुधवारी मध्यरात्री ते हॉस्पिटलच सील केले. लगेच फवारणी करीत मोंढा परिसर निर्जंतुक करण्यात आला.सिलही करण्यात आला.

चार महिन्यांपूर्वीच ती महिला औरंगाबादमध्येच एका रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाली होती. दि.27 एप्रिल रोजी पहाटे साडेचार वाजता एका खासगी वाहनाद्वारे त्या महिलेस कुटुंबियांनी सेलूस आणले. परंतू दि.28 एप्रिल रोजी त्या कॅन्सरग्रस्त महिलेस अस्वस्थ वाटल्याने कुटूंबियांनी सेलूतून परभणीत आणल्यानंतर मोंढा भागातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल केले होते. तेथून डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या महिलेस नांदेडला नेण्यात आले..त्या ठिकाणीच वैद्यकीय अधिकार्‍यांनी स्वॅब घेतले,तेव्हा ती महिला करोना पॉझिटिव्ह आढळून आली होती.त्यामुळेच त्या महिलेच्या कुटूंबातील दोन मुलांना नांदेड प्रसासनाने लगेच क्वाॅरंटाईन केले.त्या दोघांचा अहवाल निगेटीव्ह आल्याची कळाली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या