💥परभणी जिल्ह्यात अडकलेल्या मध्य प्रदेशातील ४२४ मजूर व विद्यार्थी मध्य प्रदेशात १८ बसने रवाना...!


 💥 जिल्ह्यात अडकलेल्या गुजरात राज्यातील नागरिकांनाही नोंदणी करण्याचे आवाहन💥

परभणी, दि.11  - मध्य प्रदेश येथील  काही मजूर, विद्यार्थी, कारागीर, कामगार परभणी  जिल्ह्यात  लॉकडाउन काळात अडकून पडले होते. त्यानुसार आज दि 11 मे रोजी ह्या सर्व मजूर, विद्यार्थी व नागरिक यांना परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथून 3 बसद्वारे 48 विद्यार्थी व मजूर, पाथरी डेपो मधून 3 बसद्वारे 71, पूर्णा डेपो अंतर्गत 3 बसद्वारे 66, जिंतूर डेपो अंतर्गत 1बसद्वारे 20, सेलू डेपो अंतर्गत 4 बस द्वारे 114 आणि परभणी डेपो अंतर्गत एकूण 4 बसद्वारे 105 विद्यार्थी व नागरिक असे एकूण मिळून जिल्ह्यातील 18 बसद्वारे 424 विद्यार्थी , मजूर, कामगार व नागरिक यांना  नऊ मे रोजी च्या शासन निर्णयातील तरतुदींनुसार राज्याच्या सीमेपर्यंत मोफत प्रवासाची सोय जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या आदेशान्वये करण्यात आली ..यावेळी सोशल डिस्टंसिंग चे योग्य ते पालन संबंधितांद्वारे करण्यात आले..
सदरील बस मधील प्रवाशाना पाथरी रोडवरील सरदेशपांडे नर्सरी परिसरात वीर सावरकर विचार मंच, म. शं. शिवणकर प्रतिष्ठान, लायन्स क्लब प्रिन्स,संत कंवरराम सेवा मंडळ , वुई केअर फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या सदस्यांच्या वतीने पोळी, भाजी, पुलाव, चटणी व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या देऊन जेवणाची सोय करण्यात आली.
तसेच ही बस घेऊन जाणारे चालक यांचे याप्रसंगी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला, घरगुती प्रकारचे भोजन मिळाल्याने प्रवाशांनी यावेळी आनंद व्यक्त केला.

तसेच गुजरात राज्यातील परभणी जिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी, कामगार कारागीर, मजूर यांनी संबंधित तहसिलदारांकडे  नोंदणी करावी जेणेकरून त्यांना गुजरातच्या सीमेपर्यंत बसद्वारे पोहोचवण्याची सोय करण्यात येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी केले आहे.

                                                           

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या