💥परभणी जिल्हा आरोग्य विभागाला अद्यापही 319 स्वॅबच्या रिपोर्टची प्रतिक्षाच...!



💥जिल्ह्यात आज शनिवार दि.३० मे रोजी ५३ संशयीत दाखलः संशयितांची संख्या आता २२४१💥

परभणी/कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात आज शनिवार दि.३० मे रोजी सायं.०५-०० वाजेपर्यंत एकूण ५३ संशयीत दाखल झाले असून जिल्ह्यात संशयितांची संख्या आता २२४१ पर्यंत पोचली आहे. जिल्हा आरोग्य विभागाला अद्यापही ३१९ संशयितांच्या स्वॅबच्या अहवालाची प्रतिक्षा असून प्रलंबीत अहवाला मुळे जिल्ह्याची धाकधूकी अद्यापही संपलेली नाही. 

एकूण २३७७ पैकी १८९३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण ७४ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर ६२ संशयितांचे अहवाल अनिर्णायक आहेत.२९ जणांचे स्वॅब तपासणीसाठी आवश्यक नसल्याचाही अहवाल मिळाला आहे. एकूण ३१९ स्वॅबचे अहवाल प्रलंबीत आले आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालयातून शनिवारी एकूण ५३ जणांचे स्वॅब नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. आज शनिवारी प्राप्त झाल्यापैकी निगेटीव्ह ७४ तर ६ व्यक्तींचा अहवाल पॉझीटीव्ह आला.
जिल्हा शासकीय रूग्णालयात शनिवार पर्यंत विलगिकरण कक्षात ४६६,रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात ४०० जण आहेत. विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झालेले १३७५ जण आहेत.
वाघी बोबडे येथील ६० वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझीटीव्ह आढळून आला. परंतू उपचार सुरू असतांना ती व्यक्ती मृत्यू पावल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या